मुंबई - शहर आणि जिल्ह्यांतर्गत असलेल्या १० विधानसभा मतदारसंघापैकी गुरूवारी एकूण ३१ उमेदवारांनी ४९ विधानसभा उमेदवारीचे अर्ज दाखल केले. गुरूवारी मोठ्या प्रमाणात मुंबइतील विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. यामध्ये शिवेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी इतर सर्व पक्षांनी तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेवारी अर्ज भरलेले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात आलेले आहेत.
धारावी विधानसभा मतदारसंघ –
- विकास मारोती रोकडे अपक्ष
- गणेश बाजीराव कदम अखिल भारतीय हिंदू महासभा
- वर्षा एकनाथ गायकवाड भा.रा.काँग्रेस (एकूण 3 अर्ज दाखल)
- बबीता शिंदे अपक्ष
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ –
- कॅप्टन आर. तमिल सेल्वम भाजपा (एकूण 3अर्ज दाखल केले)
- अमिरुद्दीन अलकमर निजामुद्दीन वंचित बहुजन आघाडी
वडाळा विधानसभा मतदारसंघ –
- प्रविण गारगे अपक्ष
- यशवंत वाघमारे प्रबुध्द भारत प्रजासत्ताक
- लक्ष्मण पवार वंचित बहुजन आघाडी
माहिम विधानसभा मतदारसंघ –
- यशवंत देशपांडे (संदिप देशपांडे) मनसे
- सदा सरवणकर शिवसेना
- प्रदीप नाईक भा.रा.काँग्रेस
- मोहनीश रविंद्र राऊळ अपक्ष
वरळी विधानसभा मतदारसंघ –
- आदित्य उद्धव ठाकरे शिवसेना (एकूण 4 अर्ज दाखल)
- सचिन खरात अपक्ष
शिवडी विधानसभा मतदारसंघ –
- अजय विनायक चौधरी शिवसेना (एकूण 4 अर्ज दाखल )
भायखळा विधानसभा मतदारसंघ –
- यामिनी यशवंत जाधव शिवसेना
- वरिस पठाण एमआयएम
- गीता गवळी अखिल भारतीय सेना
मलबार हिल विधानसभा मतदारसंघ –
- हिरा नवाजी देवासी भा.रा.काँग्रेस
- विशाल सोपान गुरव बसपा
- सय्यद मोहम्मद अर्शद ऐ.पी.पी.
- अभय सुरेश कठाळे नॅशनल युथ पार्टी
- राजेश जोतीराम शिंदे अपक्ष
- मंगलप्रभात लोढा भाजपा (आज 2 अर्ज दाखल)
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ –
- अमिन पटेल भा.रा.काँग्रेस (एकूण 5 अर्ज दाखल)
- पांडूरंग सपकाळ शिवसेना
- अब्बास छत्रीवाला अपक्ष
- नजीब सय्यद सरदार वल्लभाई पटेल पार्टी
कुलाबा विधानसभा मतदारसंघ –
- राजेंद्र दौलत सुर्यवंशी ऐ.पी.पी.
- संतोष चव्हाण अपक्ष