ETV Bharat / state

मुंबईत दोन महिन्यात 147 डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबईत रुग्णांवर उपचार करताना गेल्या दोन महिन्यात 147 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे, ऑक्सिजन लेव्हल तपासणे, रक्तदाब तपासणे आदी कामे करून रुग्णांना रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये भरती करणे त्यांच्यावर उपचार करणे आदी कामे डॉक्टरांना करावी लागत आहेत.

डॉक्टरांना कोरोनाची लागण
डॉक्टरांना कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 20, 2021, 4:37 PM IST

मुंबई - शहरात गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. दर दिवशी 8 ते 11 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. या रुग्णांवर महापालिका रुग्णालय, कोविड सेंटर आदी ठिकाणी उपचार केले जात आहेत. रुग्णांवर उपचार करताना गेल्या दोन महिन्यात 147 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

147 डॉक्टरांना कोरोना

मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्ण शोधून काढण्यासाठी त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे, ऑक्सिजन लेव्हल तपासणे, रक्तदाब तपासणे आदी कामे करून रुग्णांना रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये भरती करणे त्यांच्यावर उपचार करणे आदी कामे डॉक्टरांना करावी लागत आहेत. कोरोनाचे हजारो रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम डॉक्टरांकडून केले जात आहे. मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असताना त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर त्यांच्या संपर्कात आल्याने 147 डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यात कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड)चे अध्यक्ष डॉ. नीलेश कल्याणकर यांनी दिली.

निवासी डॉक्टरांना कोविड भत्ता -

कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम निवासी डॉक्टर करत आहेत. निवासी डॉक्टरांना आरोग्य विमा मिळत नाही. मागील वर्षी कोरोना पसरत असताना 10 हजार रुपये कोविड भत्ता दिला कात होता. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर हा भत्ता बंद करण्यात आला. मागील वर्षाप्रमाणे आताही कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली असल्याने त्यांच्यावर निवासी डॉक्टर उपचार करत आहेत यामुळे पूर्वी दिला जाणारा महीना 10 हजार रुपये कोविड भत्ता पुन्हा सुरु करावा अशी अपेक्षा निवासी डॉक्टरांची आहे. पालिका आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता दिला जाणार असल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली.

86 हजार 410 सक्रिय रुग्ण

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 86 हजार 692 वर पोहोचला आहे तर एकूण मृतांचा आकडा 12 हजार 404 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 86 हजार 622 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 86 हजार 410 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 47 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने 106 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. तर 1 हजार 171 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 49 लाख 82 हजार 532 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.