मुंबई ED Raid: 'मनी लॉन्ड्रिंग' प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवलेल्या 'पॅराबॉलिक ड्रग्ज' प्रकरणात दिल्ली, मुंबई, चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणी 'ईडी'ने देशात मोठ्या प्रमाणावर छापेमारी कारवाई सुरू केली आहे. विनीत गुप्ता आणि प्रणव गुप्ता हे अशोका विद्यापीठाचे संस्थापक असल्याचे तपासात उघड झालं आहे. 'ईडी'च्या छापेमारी प्रकरणी खुलासा देताना अशोका विद्यापीठाने 'पॅराबॉलिक ड्रग्ज' प्रकरणाचा विद्यापीठाशी संबंध नसल्याचे सांगितलं आणि या प्रकरणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न हा दिशाभूल करणारा असल्याचं 'स्टेटमेंट' दिलं आहे. 'ईडी'ने अशोका विद्यापीठाचे संस्थापक विनीत गुप्ता आणि प्रणव गुप्ता संचालक असलेल्या 'पॅराबॉलिक ड्रग्ज'च्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात माहिती मागवली असल्याचे 'अशोका युनिव्हर्सिटी'ने एका निवेदनात नमूद केले आहे. (ED raids at Ashoka University founder)
17 ठिकाणांवर छापेमारी: 'मनी लॉन्ड्रिंग' प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवलेल्या 'पॅराबॉलिक ड्रग्ज' प्रकरणात दिल्ली, मुंबई, चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील 17 ठिकाणी आज ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात 'पॅराबॉलिक ड्रग्ज लिमिटेड' आणि या कंपनीचे संचालक, प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांनी 1,600 कोटी रुपयांची बँक फसवणूक केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशोका विद्यापीठ पुनरुच्चार करते की, 'पॅराबॉलिक ड्रग्ज'चा अशोक विद्यापीठाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. 'अशोका युनिव्हर्सिटी'चा 'पॅराबॉलिक ड्रग्ज'शी कोणताही संबंध नाही. कंपनीची चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणास 'युनिव्हर्सिटी'शी जोडण्याचा कोणताही प्रयत्न कोणत्याही आधाराशिवाय केल्यास तो दिशाभूल करणारा आहे, असे 'युनिव्हर्सिटी'च्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी 'ईडी' तपास करत आहे.
अशोका युनिव्हर्सिटी आणि ड्रग्ज: 'अशोका युनिव्हर्सिटी'चे संस्थापक संजीव भिकचंदानी यांनी नुकतेच 'X' वर संस्थेतील कथित ड्रग्ज समस्येबद्दल 'पोस्ट' केली होती. त्यांनी त्यात लिहिले, “मी निराश झालो आहे की, अशोका येथील विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येबद्दल सरकारला फारसे काही सांगायचे किंवा करायचे नव्हते”. 'अशोका युनिव्हर्सिटी'तील अंमली पदार्थांच्या गैरवापरावर ते पुढे म्हणाले, मी जे ऐकले आहे त्यावरून अशोकाची ही समस्या वाढत आहे. ड्रोनद्वारे ड्रग्जची डिलिव्हरी आणि हॉस्टेलमध्ये रूम डिलिव्हरी केल्याच्या कथा मी ऐकल्या आहेत.
हेही वाचा:
- Lalit Patil Case Update : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात माजी महापौरांची पोलिसांकडून चौकशी
- Lalit Patil Case Update : ड्रग्ज प्रकरणात आरोपी ललित पाटीलसह अन्य दोघांना 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटील प्रकरणी ससूनच्या डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून नार्को टेस्ट करा; सुषमा अंधारेंची मागणी