मुंबई - 24 फेब्रुवारीला राज्यात रुग्णसंख्या झपाट्यानं 8 हजाराच्या घरात गेली होती. ती मागील चार दिवस 8 हजाराच्या घरातच आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात शनिवारी नव्या 8 हजार 623 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 24 तासात 51 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
CORONA LIVE UPDATE : शुक्रवारी राज्यात 8 हजारापेक्षा अधिक रुग्ण, तर 48 रुग्णांचा मृत्यू
20:21 February 27
राज्यात शनिवारी 8623 नव्या कोरोना रुग्णांची वाढ
20:01 February 27
मुंबईत कोरोनाचे 987 नवे रुग्ण, 4 मृत्यू
मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस मुंबईत एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले होते. त्यात आज किंचितशी घट होऊन रुग्णसंख्या एक हजाराच्या आत आली आहे. आज 987 नवे रुग्ण आढळून आले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
18:40 February 27
पुणे विभागातील आकडेवारी
पुणे विभागातील 5 लाख 87 हजार 121 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. विभागात कोरोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 6 लाख 14 हजार 969 झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 11 हजार 532 इतकी आहे. पुणे विभागामध्ये बरे होणाऱया रुग्णांचा दर 95.47 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
16:42 February 27
अमरावती-यवतमाळचे 262 पैकी 62 अहवाल निगेटिव्ह तर उर्वरित प्रतीक्षेत
मुंबई - अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढत असून येथे कोरोनाच्या म्युटेशनमध्ये बदल झाल्याची अर्थात येथे नवीन भारतीय स्ट्रेन आढळल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यानुसार अमरावती, यवतमाळ, पुणे आणि सातारा येथील 262 नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 62 अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य सेवा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे, पण जोपर्यंत उर्वरित 200 नमुन्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत धाकधूक कायम असणार आहे.
16:40 February 27
बुलडाण्यात लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा - जिल्हाभरात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात फैलावत चाललेली कोरोना संक्रमणाची श्रृंखला तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 मार्चपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला आज (27 फेब्रुवारी) नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
16:13 February 27
मुंबई - शहर परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह, गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत २० एप्रिल ते २६ फेब्रुवारीपर्यंत १७ लाख १३ हजार ३८५ लोकांवर कारवाई करून ३४ कोटी ६२ लाख ८४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर २६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १९ हजार ८४९ लोकांवर कारवाई करत ३९ लाख ६९ हजार ८०० रुयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

15:32 February 27
इच्छुक उमेदवारांकडून कोरोना वाढीचा प्रचार व प्रसार
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे इच्छुकांनी गुडघ्यांना बाशिंग बांधून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, आपण निवडून येणार का नाही? हे माहिती नाही पण हे इच्छूक उमेदवार कोरोनाला नक्की निवडून आणणार हे चित्र आहे. इच्छुक उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून प्रचाराला सुरुवात केली असली तरी कोरोनाचे कोणतेच नियम पाळत नसल्याचे चित्र आहे.
15:24 February 27
संचारबंदीत नगरमधील हॉटेल्स-बार सुरूच
अहमदनगर - शहरासह जिल्ह्यात रात्री नऊ पूर्वी दुकाने बंद करण्याचे तसेच रात्री दहानंतर पहाटे पाचपर्यंत संचारबंदी आहे. नगर शहरात मात्र हा नियम हॉटेल्स-बारवाल्यांना आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. शहरातील विविध रस्त्यांवर असलेली हॉटेल्स आणि बार रात्री नऊनंतरही सुरूच असून या ठिकाणी ग्राहक आणि मद्यपींची मोठी रेलचेल दिसून येत आहे.
15:20 February 27
भविष्यातील लॉकडाऊनसाठी नागपूर पोलीस यंत्रणा सज्ज:- नागपूर पोलीस आयुक्त
नागपूर - कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागपूर शहराची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आल्याचं बोललं जात आहे. शहरात लॉकडाऊन लागल्यास पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे. शहरात अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. याचबरोबर त्यांनी नागरिकांकडून नियमांचे पालन होत असल्याचं देखील सांगितले आहे.
15:15 February 27
अमरावतीमधील लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला
अमरावती - जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सात दिवसांसाठी अमरावती शहर, अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला आहे. परंतु, रुग्णसंख्येत घट होत नसून सातत्याने वाढ होत असल्याने आता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन ८ मार्चपर्यंत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. तसेच अंजनगाव सुर्जी शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अंजनगाव सुर्जी हे शहर देखील लॉकडाऊन होणार आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा या सुरू राहणार आहेत.
12:37 February 27
12:33 February 27
यवतमाळ : वाढोन्यातील आरोग्य केंद्र रामभरोसे; अधिकारी गैरहजर, नागरिकांची गैरसोय
यवतमाळ - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अलर्ट राहणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा पवार यांनी वाढोना बाजार येथील आरोग्य केंद्राला भेट दिली असता तेथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने वेळेवर जर एखादा रुग्ण आला, तर त्याचे उपचार कसा होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
12:31 February 27
नागपूर : पालकमंत्री नितीन राऊतांनी घेतला लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा
नागपूर - शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आगामी काळात लॉकडाऊन लावण्याची गरज भासू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने सर्वाधिक जबाबदारी आणि ताण हा पोलीस यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची तयारी आहे का, हे जाणून घेण्यासाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.
09:20 February 27
अंगारकी चतृर्थीला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे.
09:17 February 27
अमरावतीत शुक्रवारी आढळले ७५४ नवे रुग्ण
अमरावती - जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी अमरावतीत तब्बल ७५४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर ८ रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ही ३३५८४ वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा हा ४९५ वर पोहचला आहे. आजपर्यंत अमरावती जिल्ह्यातील २८३५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ४७३२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
09:10 February 27
शुक्रवारी या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई पालिका - 1035
- ठाणे - 106
- ठाणे पालिका - 186
- नवी मुंबई पालिका - 135
- कल्याण डोंबिवली पालिका - 187
- नाशिक -113
- नाशिक पालिका - 220
- अहमदनगर - 118
- अहमदनगर पालिका - 65
- जळगाव - 185
- जळगाव पालिका - 171
- पुणे - 312
- पुणे पालिका - 765
- पिंपरी चिंचवड पालिका - 368
- सातारा - 137
- औरंगाबाद पालिका - 174
- अकोला - 153
- अकोला पालिका - 82
- अमरावती - 247
- अमरावती पालिका - 720
- यवतमाळ - 109
- बुलढाणा - 140
- वाशिम - 150
- नागपूर - 293
- नागपूर पालिका - 881
- वर्धा - 199
09:08 February 27
नागपूरमध्ये शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर
नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचे आवाहन महापौर आणि पालिका आयुक्तांनी केले आहे.
09:06 February 27
बुलडाणा जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी असणार कडक लॉकडाऊन
बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मात्र, शनिवार व रविवारी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या बाजारपेठ सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू आहेत.
09:00 February 27
शुक्रवारी नागपूरमध्ये 1074 कोरोनामुळे रुग्णांची भर; तर 6 जणांचा मृत्यू
नागपूर - राज्यातील काही भागात कोरोना बधितांची रुग्णसंख्या वाढत असताना उपराजधानीत तिसऱ्या दिवशी एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी नागपूरमध्ये 1074 रुग्णांची भर पडली. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सर्वाधिक 12396 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
08:59 February 27
उद्योग चालत नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची; व्यावसायिकांना चिंता
बीड - मागील एक वर्षापासून कोरोनाचे संकट आहेत. मागच्या तीन महिन्यात कसेतरी शासनाने उद्योगधंद्यांना सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, पुन्हा अजून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. परिणामी छोटे-मोठे उद्योग पुन्हा मंदावले आहेत. आता अशा सगळ्या बिकट परिस्थितीत व्यवसाय करायचा कसा, तसेच बँकेचे हप्ते फेडायचे कसे, अशी चिंता अनेक व्यावसायिकांना सतावत आहे. तर दुसरीकडे बँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत, अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील व्यावसायिक सापडले आहेत.
08:36 February 27
शुक्रवारी राज्यात 8333 कोरोना रुग्णांची भर
मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती, 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र, त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज तिसऱ्या दिवशीही 8 हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळून आली आहे. शुक्रवारी राज्यात 8333 नवीन रुग्ण आढळून आले, तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.