ETV Bharat / state

Breaking News : शिवाजी नगर पोलिसांनी 4 ड्रग्ज तस्करांसह 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना केली अटक - Maharashtra breaking news

ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Feb 11, 2023, 9:13 AM IST

Updated : Feb 11, 2023, 9:58 PM IST

21:57 February 11

शिवाजी नगर पोलिसांनी 4 ड्रग्ज तस्करांसह 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना केली अटक

शिवाजी नगर पोलिसांनी एमडी ड्रग्जसह 4 ड्रग्ज तस्कर आणि 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. दोन नायजेरियन बेकायदेशीरपणे भारतात राहत होते. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली.

21:45 February 11

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चार गाड्या ठोकल्या

पुणे ; नवले पुल परिसरातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. हि घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.

21:08 February 11

अंगणवाडी सेविकाने केली आत्महत्या

अंगणवाडी सेविकाने केली आत्महत्या

तीन वर्षापासून पगार थकला आणि आयसीडीएस अडीच अधिकाऱ्यांचा जाच

अंगणवाडी सेविकाने केली आत्महत्या

धडगाव जिल्ह्यातील राहणाऱ्या अंगणवाडी सेविकाने केली आत्महत्या

19:18 February 11

रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीला वाचवताना गाडीवरचा सुटला ताबा आणि झाला अपघात; एक ठार

बीड - धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई जवळ असलेल्या गढी फाटा येथे गेल्या आठ दिवसा पूर्वी एका दुचाकी व चार चाकीची जोरात धडक झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ दिवसातच ही दुसरी घटना गढी फाटा येथे घडली असून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

19:17 February 11

काँग्रेसच्या मसुदा समितीत बाळासाहेब थोरात यांना स्थान नाही

मुंबई - काँग्रेसचे ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी होणार असून, या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या मसुदा समिती व विविध उपसमूहांमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना वगळण्यात आले आहे.

19:02 February 11

कोविडचा यकृतावर लक्षणीय परिणाम, नायर रुग्णालयातील अभ्यासात निष्कर्ष

मुंबई - कोविड-19 चा श्वसन आणि इतर महत्वाच्या प्रणालींव्यतिरिक्त यकृतावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, असे येथील नागरी संचालित रुग्णालयाने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. नायर हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे. कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यासाठीच्या रुग्णालयांपैकी हे प्रमुख रुग्णालय होते. या सर्वेक्षणात सहभागी जवळजवळ अर्ध्या लोकांना यकृतामध्ये विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रकाशन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये यासंदर्भातील अभ्यासाचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

18:51 February 11

कोल्हापुरात शेतामध्ये हातात भाकरी घेऊन मुख्यमंत्र्यांनी केले जेवण

कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी आज भेट देऊन महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी चक्क हातात भाकरी घेऊन जेवण केले. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही हातात भाकरी घेऊन जेवणाचा आस्वाद घेतला.

18:09 February 11

संजय राऊत यांनी मला माझ्या शक्तीची जाणीव करून दिली...नाना पटोले

पुणे :- विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले असते तर कदाचित महाविकास आघाडी सरकार अजूनही टिकलं असतं असं संजय राऊत म्हणाले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, मी किती शक्तिवान आहे याची तारीफ संजय राऊत यांनी केली आहे. माझ्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. संजय राऊत यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी मला माझ्या ताकतीच अनुभव करून दिला आहे. त्यामुळे या टीप्पणीला सकारात्मक घेतलं पाहिजे.असं, यावेळी नाना पटोले म्हणाले.

17:42 February 11

दोन अल्पवयीन विधार्थ्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू

ठाणे : भिवंडी शहरात दोन वेगवेगळ्या वाहन अपघातांच्या घटनेत दोघा अल्पवयीन विधार्थ्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अल्पवयीनांच्या अपघाती मृत्यूंमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तर या दोन्ही अपघात प्रकरणी ट्रक चालकांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

17:25 February 11

मुलुंड पश्चिम भागातील हॉटेलला आग; तिघे जखमी

मुंबई - मुलुंड पश्चिम भागातील एका हॉटेलला आज दुपारी आग लागली होती. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत.

17:17 February 11

रविकांत तुपकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुरू केलं अन्नत्याग आंदोलन

बुलडाणा - शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू केलेलं आंदोलन पोलिसांनी दडपलं आहे. पोलिसी बळाचा वापर करत हे आंदोलन दडपून लावण्यात आलं आहे. त्यामुळे रविकांत तुपकर हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पोलीस कोठडीत मी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे.

16:39 February 11

तुम्ही अदानीचे चौकीदार आहात की 140 कोटी लोकांचे - पटोलेंचा मोदींना सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींच्यावर थेट टीका केली आहे. मोदींचे भाषण ऐकल्यावर ते 'पान टपरी'वर असल्यासारखे बोलले, असे पटोले म्हणाले आहेत. मात्र त्यांना राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पटोले म्हणाले की, तुम्ही अदानीचे चौकीदार आहात की 140 कोटी लोकांचे, या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे

16:25 February 11

शिवसेनेचे नेते नरेश मणेरा यांना न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी लगेच केला अर्ज

शिवसेनेचे नेते नरेश मणेरा यांना ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली. आयपीसी कलम 354 आणि इतर लागू केले. 354 आयपीसी अर्थात महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे याअंतर्गत एफआयआर दाखल केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लगेच त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी होईल.

16:22 February 11

जडेजाला मुंबई पोलिसांनी केली अटक; फसवणूक केल्याचा आरोप

मुंबई - एलआयसी एजंट असल्याचे भासवत तोंडात सोन्याचे दोन दात घालून १५ वर्षांपासून फरार असलेल्या प्रवीण आशुभा जडेजा नावाच्या ३८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याने कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम केले आणि 2007 मध्ये दुकान मालकाची 40 हजार रुपयांची फसवणूक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीने आपली ओळख बदलली होती. तसेच मुंबईहून गुजरातच्या कच्छमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर तो लपून बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

15:59 February 11

संजय राऊत पब्लिसिटीसाठी विधाने करतात - मंत्री गिरीश महाजन

मुंबई - पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांना टोला लगालवा आहे. संजय राऊत पब्लिसीटीसाठी विधाने करतात , असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

15:42 February 11

इस्लापूर पोलिसांची सामाजिक कार्यकर्त्यांना विवस्त्र करून जबर मारहाण

नांदेड - किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना विवस्त्र करत जबर मारहाण केली आहे. पोलिसांच्या या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत सामाजिक कार्यकर्त्यानी न्याय मागितला आहे. विशेष म्हणजे गोवंशाच्या गुरांची तस्करी रोकणाऱ्या कार्यकर्त्यांना टारगेट करत पोलिसांनी ही मारहाण केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला आहे. एखाद्या कट्टर गुन्हेगाराला लाजवेल अशा पद्धतीने नग्न करत पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण केली. आता यातील दोषी पोलिसांवर काय कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

15:26 February 11

बॉल टँपरिंग प्रकरणी जडेजाला दंड

नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीनुसार जडेजाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला. 9 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 46 व्या षटकात जडेजा बोटाला क्रीम लावताना दिसला होता. त्यावरुन याबाबत वादळ उठले होते.

14:40 February 11

नागपूर कसोटीत तिसऱ्याच दिवशी भारताचा ऑस्ट्रेलियावर एक डाव राखून दणदणीत विजय

नागपूर कसोटीत तिसऱ्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.

13:46 February 11

Breaking News : बुलढाण्यात रविकांत तुपकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला

बुलढाणा : बुलढाण्यात रविकांत तुपकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नसल्याने तुपकर आक्रमक. पीकविमा, कापूस दरवाढ देण्याची तुपकरांची मागणी.

13:23 February 11

पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई - पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

12:41 February 11

अदानी हिंडेनबर्ग वादावर नियामक योग्य निर्णय घेतील - निर्मला सीतारामन यांचा पुनरुच्चार

अदानी-हिंडेनबर्ग वाद आणि सुप्रीम कोर्टाची चिंता यावर केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, या क्षेत्रातील नियामक खूप अनुभवी आहेत आणि ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ आहेत. कोणतेही घोटाळे होऊ नयेत, यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे जर काही झाले असेल, तर ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील.

12:19 February 11

ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक

ठाणे - सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी एका 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही महिला मुंबईतील अंधेरीची रहिवासी आहे. तिच्यावर अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर तिला कळवा नाका येथून गुरुवारी ताब्यात घेण्यात आले.

12:10 February 11

पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांची निर्दोष मुक्तता

ठाणे - वैवाहिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह त्याच्या आई वडिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 16 जानेवारी 2017 रोजी कळवा येथील घरी झालेल्या छळामुळे लक्ष्मीने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या पती आणि सासू सासऱ्यांविरोधात खटला सुरू झाला होता. त्याचा निकाल आता लागला आहे.

12:07 February 11

भिवंडीत बिल्डरकडे ५ लाखांची मागणी करणाऱ्या व्यक्तीला अटक

ठाणे - भिवंडी येथील एका बिल्डरकडून 5 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या 55 वर्षीय आरोपीला गुरुवारी कोनगाव येथून बिल्डरला धमकावून त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांनी दिली.

11:57 February 11

भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा

नागपूर कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली आहे.

07:32 February 11

Breaking News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिस यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

Last Updated : Feb 11, 2023, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.