ETV Bharat / state

मुंबईत कलम 144 ची अंमलबजावणी, वर्षभरात 60 हजारांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल

author img

By

Published : Apr 15, 2021, 3:31 PM IST

Updated : Apr 15, 2021, 4:30 PM IST

वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

कारवाई कताना
कारवाई कताना

मुंबई - कोरोनाच्या दुसरी लाटेमध्ये दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दिवसाला 9 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून बुधवारी (दि. 15 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नाकाबंदीद्वारे अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

वर्षभरात 60 हजार 195 जणांवर गुन्हे दाखल

मार्च 2020 ते एप्रिल 2021 या दरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात कलम 188 उल्लंघन करणाऱ्या 60 हजार 195 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये 9 हजार 203 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आत्तापर्यंत 23 हजार 370 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून तब्बल 27 हजार 622 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींची जामीनावर सुटका केली आहे.

सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईत

मुंबई पोलिसांनी मुंबईतील दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर अशा विभागात आतापर्यंत 28 हजार 332 गुन्हे दाखल केले असून यामध्ये दक्षिण मुंबईतून 6 हजार 582, मध्य मुंबईतून 2 हजार 976, पूर्व मुंबईतून 3 हजार 856, पश्चिम मुंबईतून 4 हजार 4 तर सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईत 10 हजार 914 नोंदविण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोना रुग्ण संदर्भात, हॉटेल, आस्थापना विहित वेळेपेक्षा अधिक वेळ चालू ठेवणे, इतर दुकाने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक व मास्क न वापरल्या बाबत नोंदविण्यात आलेले आहेत.

हेही वाचा - रेमडेसिवीरच्या खरेदीत घोटाळा नाही, जीव वाचवणे महत्वाचे - महापौर किशोरी पेडणेकर

Last Updated : Apr 15, 2021, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.