मुंबई : IIT Mumbai: आयआयटी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी प्लेसमेंटमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी केलेली आहे. (IIT Campus Placement) यावर्षी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या 16 ऑफर आयटीच्या विद्यार्थ्यांनी मिळवल्या आहेत. तर सर्वाधिक परदेशी प्लेसमेंटमध्ये वर्षाला साडेतीन कोटी रुपये पगाराचे पॅकेज देखील आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळाले. तर मागच्या वर्षी दीड कोटी रुपये वार्षिक पगाराच्या तुलनेत यंदा अधिक पगाराची नोकरी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे. यंदा साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जरा अधिक वार्षिक पगाराची नोकरी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना (IIT Mumbai Student) मिळालेली आहे.
माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा : आयटी विद्यार्थ्यांचे कोटीच्या कोटी उड्डाणे प्लेसमेंटमध्ये दरवर्षी प्राप्त करतात. यंदा मागच्या वर्षापेक्षा अधिक भरघोस पगाराची मिळाली आहे. देशी आणि विदेशी दोन्ही ठिकाणी नोकरी प्राप्त केलेली आहे. मागच्या वर्षी माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा कमी होता. यंदा मात्र तो वाढला आहे. यंदाच्या हंगामात आयआयटीज मुंबईच्या विद्यार्थ्यांना 21 लाख 8 हजार रुपये सरासरी पगार आहे. (IIT Mumbai News) यावर्षी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त अशा 16 ऑफर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना 30 प्लेसमेंट ऑफर : तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये यंदा आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक उत्तम कामगिरी केलेली आहे. मागील दोन वर्षापेक्षाही कामगिरी सरासरी चांगली आहे. देशी आणि विदेशी प्लेसमेंट ऑफर विद्यार्थ्यांना आल्या होत्या. तर 65 ऑफर या आंतरराष्ट्रीय तर 194 या देशी ऑफर आल्या होत्या. अर्थात मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय ऑफर अधिक होत्या. तुलनेने यंदा कमी आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंटमध्ये घट : यावर्षी नेदरलँड, इंग्लंड, जपान, अमेरिका आणि हॉंगकॉंग तैवान येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑफर होत्या. तसेच युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय ऑफर यंदा थोड्या कमी झाल्या. आयटीच्या या नोकऱ्या प्राप्त करणाऱ्यांमध्ये बी टेक आणि एकाच वेळेला दोन डिग्री घेणारे विद्यार्थी अधिक आहेत. तसेच एमटेक डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपैकी नऊशे विद्यार्थी या नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात सहभागी होते. 2022-23 मध्ये 1845 विद्यार्थ्यांपैकी 1516 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्राप्त झाले.
हेही वाचा -
- IIT Mumbai News : धक्कादायक! आयआयटी मुंबईसह इतर विद्यापीठांमध्ये विद्यार्थी समुपदेशन केंद्र केवळ नावापुरते!
- controversy in IIT Mumbai : आयआयटी मुंबईत शाकाहारवाले म्हणतात येथे मांसाहारांना जागा नाही
- IIT Mumbai: आयआयटी मुंबई देशात अव्वल पण जगात 47 व्या स्थानावर; क्यूएस जागतिक विद्यापीठ श्रेणी अहवाल जाहीर