ETV Bharat / state

Sharad Pawar on CM : आत्मविश्वास नसला की ज्योतिषाला हात दाखवला जातो, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Pawar criticizes shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना ज्योतिषाकडे आपला हात दाखवला असल्याची चर्चा सुरू आहे. आत्मविश्वास नसला की ज्योतिषाला हात दाखवला जातो, असा खोचक टोला (Sharad Pawar on CM) पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Sharad Pawar on CM
आत्मविश्वास नसला की ज्योतिषाला हात दाखवला जातो, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
author img

By

Published : Nov 24, 2022, 6:28 PM IST

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना ज्योतिषाकडे आपला हात दाखवला असल्याचे चर्चा सुरू असताना यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रीया (Sharad Pawar on CM) दिली आहे. ज्योतिषावर आपला विश्वास नाही. मात्र, आसाममध्ये काय घडलं हे संपूर्ण देशाला माहित आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवणे या सर्व गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. आत्मविश्वास नसला की ज्योतिषाला हात दाखवला जातो असा चिमटा शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला आहे.

आत्मविश्वास नसला की ज्योतिषाला हात दाखवला जातो, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला: महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य (Progressive State) आहे. विज्ञानवादी विचार करणारा राज्य आहे. मात्र, आता या नवीन गोष्टी पाहिला मिळत आहेत. असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच आपण काही ज्योतिषी नाही. त्यामुळे राज्य सरकार केव्हा कोसळेल ते आपण सांगू शकणार नाही. तसेच आपण दौरा सोडून हात दाखवायला कुठेही जात नाही. हल्ली महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत असल्याचे शरद पवार म्हणाले.

नेत्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासात दोन गुन्हे दाखल झाले. मात्र, हे दोन्ही गुन्हे दाखल करून आवाज उठवणाऱ्या नेत्यांचा आत्मविश्वास कमी करून नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपलं लक्ष सोडून भटकणार नाहीत असा विश्वास शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेतून बोलून दाखवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.