मुंबई: नागालॅंडमध्ये त्यांच्या पाच जागांवर राकॉं दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जिंकले आहेत. दोन्ही पक्षाने एकत्रितरीत्या या निवडणुका लढवत बहुमत मिळविले आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीत तेथील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली. रवींद्र धांगेकर यांना विजयी करत कसबा पेठ मतदारसंघातील जनतेने लोकशाही स्वीकारले असल्याचा चिमटा भारतीय जनता पक्षाला रोहित पवार यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमाची संवाद साधताना काढला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांचा पराजय झाला. मात्र झालेल्या बंडखोरीमुळे हा पराजय झाला आहे. तो राहुल कलाटे यांना जवळपास 40 हजार मते मिळाली. मात्र ही चाळीस हजार मते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतदानापेक्षा कमी आहेत. एकत्रित रित्या पिंपरी चिंचवड येथीलही निवडणूक लढली असती तर विजय महाविकास आघाडी च्या उमेदवाराचा असता असेही मत रोहित पवार यांनी व्यक्त केल आहे.
पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना सोयी द्या: मुंबईत होणाऱ्या पोलीस भरतीसाठी 5 हजार जागांसाठी आठ लाख उमेदवार झाले आहेत. रात्रभर प्रवास करून पहाटेच शारीरिक चाचणी देण्यासाठी उमेदवारांना मैदानात उतरावे लागत असल्याने त्यांचा रात्रभर व्यवस्थित आराम होत नाही. त्यामुळे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची आणि खाण्याची सोय व्हावी, यासाठी आपण सभागृहात मुद्दा मांडला होता. यावर राज्य सरकारने सकारात्मक उत्तर देऊन अशा उमेदवारांची राहण्याची सोय केली जाणार असल्याचे आश्वासन दिल असल्याचं रोहित पवारांनी सांगितला आहे.
निलेश राणे यांच्यावर टीकास्त्र: नारायण राणे यांना वांद्रे येथील पोट निवडणुकीत शिवसेनेच्या महिला उमेदवारांनी हरवल असल्याची उपहासात्मक टीका अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड येथे अश्विनी जगताप यांचा विजय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या बाबत वादग्रस्त ट्विट केला आहे. मात्र केवळ आपल्या ट्विट वरून बातम्या व्हाव्यात यासाठी निलेश राणे अशा प्रकारचे ट्विट करतात निलेश राणे यांची राजकीय वैचारिक पातळी अत्यंत खालची आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपण बोलणं योग्य नाही असा टोला रोहित पवार यांनी निलेश राणे यांना लगावला आहे.
वारिसे हत्याकांडावर रोहित पवार बोलले: कोकणामध्ये नाणार रिफायनरी होऊ नये. हे कोकणासाठी फायद्याचे नाही. या विरोधात लिहिणारे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येचा मुद्दा विधानसभेत मांडू. असे जर कोणी कोणाविरुद्ध लिहीत असेल आणि म्हणून त्याचा जर खून होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी 11 फेब्रुवारी, 2023 रोजी पुणे येथे व्यक्त केले होते.
आमदार प्रणिती शिंदे यांना सुद्धा उत्तर: आमदार रोहित पवार आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. आमचे नेते अजित पवार विरोधी पक्ष नेते म्हणून हा प्रश्न मांडतील. अशा प्रकारच्या घटना होत असतील तर या चुकीचे आहेत. त्यावेळी त्याने सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादावर सुद्धा प्रतिक्रिया दिली. मी माझी भूमिका मांडली नसून तेथील पक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका मांडली. त्यामुळे मी वैयक्तिक भूमिका मांडलेली नाही. मी जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि प्रणिती शिंदे या मला मोठ्या बहिणी सारख्या आहेत. त्यामुळे हा वाद काय मोठा नाही. सर्व मतभेद विचारून आपला विरोधक हा भाजपा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे मतभेद विसरून एकत्र यायला हवे असे म्हणत त्याने आमदार प्रणिती शिंदे यांना सुद्धा उत्तर दिले आहे.