ETV Bharat / state

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या पतीचा जामीन अर्ज फेटाळला

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Nov 12, 2020, 5:11 PM IST

Updated : Nov 12, 2020, 6:59 PM IST

दिपक कोचर
दिपक कोचर

मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टाने जामीन याचिका फेटाळली. बेकायदेशीर कर्ज प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लाँड्रिंग प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत सप्टेंबरमध्ये दीपक कोचर यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायाधीशांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

बेकायदेशीर कर्ज प्रकरण

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर दिपक कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि इतरांविरूद्ध सक्तवसुली संचलनालयाने मनी लाँड्रिंगचा फौजदारी खटला दाखल केला होता. त्यानंतर ईडीने दीपक कोचर यांना सप्टेंबरमध्ये अटक केली होती. आयसीआयसीआय बँकेने 'व्हिडीओकॉन ग्रुप ऑफ कंपनीला 1 हजार 875 कोटी रुपयांच्या कर्ज मंजूर केल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. या निधीतून एनआरएलकडून 10.65 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, असा आरोप ईडीने केला आहे. एनआरपीएलमध्ये 74.55 कोटी रुपयांचे बेकायदेशीर पैशांचे व्यवहार झाल्याचे ईडीच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ असताना त्यांनी भ्रष्टाचार करून व्हिडिओकॉन कंपीनीला सुमारे साडेतीन हजार कोटींचे कर्ज मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या पतीवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी संशय असल्यावरून ईडीने दीपक कोचर व व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांची चौकशी केली आहे. व्हिडिओकॉनला कर्ज मिळण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या चेअरमन चंदा कोचर यांनी आर्थिक फेरफार केल्याचा ईडीला संशय आहे. सक्तवसुली संचलनालयाने चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या मालमत्तेची तपासणी केली आहे. पीएमएलए कायद्यानुसार मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Last Updated : Nov 12, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.