ETV Bharat / state

ICICI Donation: 'या' कार्यासाठी 'आयसीआयसीआय' कडून टाटा मेमोरियलला बाराशे कोटींची मदत - सामाजिक कार्यांसाठी आयसीआयसीआयचे डोनेशन

'आयसीआयसीआय' बँकेच्या फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणून कर्करोग रुग्णांसाठी काम करणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बाराशे कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या पैशातून पंजाब, नवी मुंबई आणि विशाखापट्ट्नम या ठिकाणी नवीन केंद्रे उभारली जाणार असल्याची माहिती बॅंकेच्या वतीने देण्यात आली.

ICICI Donation
'आयसीआयसीआय'
author img

By

Published : Jun 2, 2023, 8:06 PM IST

'आयसीआयसीआय बॅंक' पत्रपरिषद

मुंबई: उद्योग जगतातील अनेक कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी विविध समाज उपयोगी कामांसाठी दिला जातो. 'आयसीआयसीआय' या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून कर्करोग उपचार आणि संशोधनासाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील तीन महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे बाराशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे, अशी माहिती 'आयसीआयसीआय' बँकेच्या वतीने देण्यात आली.

कुठे? किती निधी? 'आयसीआयसीआय फाउंडेशन'तर्फे 'सीएसआर' निधीमधून सुमारे साडेसात लाख चौरस फुटांच्या क्षेत्रावर तीन नवीन इमारती बांधल्या जाणार आहे. टाटा मेमोरियलच्या केंद्रांवर अत्याधुनिक मशीनसह सुसज्ज यंत्रणा उभी करण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात येणार आहे. यापैकी नवी मुंबईत इमारत आणि साधनसामग्री उभी करण्यासाठी 407 कोटी रुपये, पंजाबमधील मुलंनपूर येथे सुसज्ज कर्करोग उपचार केंद्र उभारण्यासाठी 350 कोटी रुपये आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे असे केंद्र उभारण्यासाठी 390 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

'एस आर फॉर्म' उपक्रम राबवणार: कोणत्याही संस्थेच्या 'टीएमसी'च्या सर्वांत मोठ्या योगदानासह 'आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्वेस्टीव्ह ग्रोथ' हे 'एस आर फॉर्म' उपक्रम राबवणार आहे. या तिन्ही केंद्रांची उभारणी आणि सुसज्ज निर्मिती 2017 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.

आयसीआयसीआयच्या सेवाशुल्कात बदल: तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. भारताची आघाडीची खासगी बँक आयसीआयसीआयने आर्थिक व्यवहारावरील सेवाशुल्कात जुलै, 2021 पासून बदल केला आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे, चेक वटविणे यासाठी जादा शुल्क द्यावे लागणार आहे.आयसीआयसीआय बँकेने सुधारित सेवा शुल्काची वेबसाईटवर माहिती दिली आहे. बँकेच्या सेवा शुल्कात 1 ऑगस्ट 2021 पासून बदल होणार आहे.

शुल्कात असा होणार बदल: ग्राहकांना एका महिन्यात 2 लाखापर्यंत पैस काढणे व जमा करण्याकरिता आर्थिक व्यवहार मोफतपणे करता येणे शक्य होते. बँकेच्या नव्या शुल्कानुसार ग्राहकांना एका खात्यावर जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत पैसे काढणे व जमा करण्याची सेवा मोफत घेता येणार आहे.

हेही वाचा:

  1. Explained GDP Growth : भारताची ७.२ टक्के जीडीपी वाढ कशी झाली, वाचा सविस्तर
  2. Opting for home loan transfer : गृहकर्ज हस्तांतरणाची निवड करताय? या पर्यायांचा करा विचार
  3. Rs 2000 Note Withdrawal: 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय 'चांदी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.