ETV Bharat / state

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची 20 वी बदली; आता कोठे होणार बदली ?

तुकाराम मुंढे हे कुठेच जास्त काळ टिकले नाहीत. त्यांच्या कायमच बदल्या होत राहिल्या आहेत. पण, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. तुकाराम मुंढे यांची 20 वी बदली झाली ( Tukaram Mundhe 20th Transfer ) आहे.

author img

By

Published : Nov 30, 2022, 9:53 AM IST

Tukaram Mundhe Transfer
तुकाराम मुंढे यांची बदली

मुंबई : कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून दरारा असलेल्या तुकाराम मुंढे यांची मंगळवारी कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून बदली करण्यात ( Transfer from Family Welfare Department ) आली. त्यानंतर तुकाराम मुंढे कोणत्या खात्यात जाणार, हे अद्याप निश्चित झालेले ( IAS Tukaram Mundhe Transfer ) नाही. मात्र, अवघ्या ५९ दिवसांत तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागातून बदली झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नाराजी हे तुकाराम मुंढे यांच्या बदलीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

आत्तापर्यंतच्या बदल्या : ऑगस्ट 2005 साली प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर. सप्टेंबर 2007 साली उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग. जानेवारी 2008 साली सीईओ, जिल्हा परिषद नागपूर. मार्च 2009 साली आयुक्त, आदिवासी विभाग. जुलै 2009 साली सीईओ, वाशिम. जून 2010 साली सीईओ, कल्याण. जून 2011 साली जिल्हाधिकारी, जालना. सप्टेंबर 2012 साली विक्रीकर सहआयुक्त मुंबई. नोव्हेंबर 2014 साली सोलापूर जिल्हाधिकारी. मे 2016 साली आयुक्त, नवी मुंबई महापालिका. मार्च 2017 साली मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे. फेब्रुवारी 2018 साली आयुक्त, नाशिक महापालिका. नोव्हेंबर 2018 साली सहसचिव, नियोजन. डिसेंबर 2018 साली प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई. जानेवारी 2020 साली आयुक्त, नागपूर महापालिका. ऑगस्ट 2020 साली सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई. जानेवारी 2021 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत. सप्टेंबर 2022 साली आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान. 29 नोव्हेंबर 2022 साली कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही. अशा प्रकारे तुकाराम मुंडेंच्या एकूण 19 वेळा बदल्या झाल्या ( IAS Tukaram Mundhe ) आहेत.

2005 सालचे आयएएस बॅचचे अधिकारी : आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी ( Tukaram Mundhe 2005 batch IAS officer) आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.