मुंबई : पत्नीसह दोन मुली आणि एक मुलगा सोडून जाऊन 50 दिवस झाल्याने माथेफिरू चेतन गाला संतप्त झाला. पन्नासाव्या दिवशी आरोपी चेतन गालाने रागाच्या भरात आणि आपल्या कुटुंबीयांना भडकवत असल्याच्या संशयातून जैन रवाई मिस्त्री (77) आणि लिलाबाई मिस्त्री (70) यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
चाळीतील दुसऱ्या मजल्यावर सुरू झालेले भांडण सोडवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून स्नेहल आणि जेनिल ब्रह्म भट या मायलेकी दुसऱ्या मजल्यावर धावत आल्या. मात्र या हल्ल्यात जेनिलच्या मानेवर चाकूचा घाव झाल्याने मृत्यू झाला आहे. आपल्या मजल्यावर नेमके काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या लोकांच्या अंगावर आरोपी चेतन गाला धावून आला. चाकू घेऊन समोरून धावत येत होता. आओ अब तारो बारी छे असे म्हणत होता.
अन् राजू भाई यांनी पळ काढला... राजू भाई उर्फ जय शहा यांच्या पत्नीने घरातील बॅट त्यांना हातात आणून दिली. त्यानंतर राजू भाई यांनी ती बॅट उगारली. त्यामुळे चेतन गालाने त्यांच्यासमोर येण्याची हिंमत केली नाही. वेळीच राजू भाई यांनी पळ काढून आपले घर गाठले. दरवाजा बंद करून घरातील व्हेंटिलेशनसाठी असलेल्या खिडकीतून राजू भाई यांनी बॅट दाखवून आरोपी चेतन गाला याला अब तारो बारी छे असे म्हटले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अनेकांना बसला धक्का हल्ल्यात पार्वती मेन्शन चाळीतील राजू भाई हे रहिवाशी थोडक्यात बचावले. त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. राजू भाई हे गेल्या अनेक वर्षांपासून पार्वती मेन्शन या चाळीत राहतात. पार्वती मेन्शन ही डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या आणि ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर बसलेली चाळ आहे. बहुतांश गुजराती आणि जैन रहिवासी राहत असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपीने बारा दिवसांपूर्वी खुनाच्या घटनेसाठी चाकू खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चेतन गाला याने नियोजित खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. खुनाच्या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. अद्याप, अनेकजण धक्क्यातून सावरलेले नाहीत.