मुंबई : 2019 मध्ये मुलाचे लग्न झाले काही दिवसातच सासऱ्याने सुनेवर वाईट नजर ठेवत तीचा लैंगिक छळ सुरू केला तीने ही बाब. नवऱ्याला सांगितली. मात्र पतीने त्याकडे दुर्लक्ष केले. आणि पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. या संदर्भातील खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला. त्याबाबतच्या झालेल्या आजच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती ए एस गडकरी व शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने पतीला निर्देश देताना. कुटुंबाची देखभाल म्हणून पिडीतेला दर महा 12 हजार रुपये आणि तर तडजोडीसाठी 25 लाख रुपये पत्नीला देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने म्हणले आहे की, नवऱ्याने दोन मुलांचा देखभाल खर्च दिला पाहिजे.
2019 मध्ये या दोघांचे लग्न झाले त्यांचा संसार सुखाने सुरू होता .मात्र काही महिन्यातच सासऱ्याकडून सुनेचा छळ सुरू झाला. सासऱ्याने लैंगिक शेरे आणि इशारे सुरु केले. सुनेने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु या गोष्टी वाढतच गेल्या. नवऱ्याला ही बाब सांगून देखील नवऱ्याने याबाबत दखल घेतली नाही .उलट त्याने सासऱ्याची म्हणजे त्याच्या बापाचीच साथ दिली. परिणामी याबाबत गुन्हा दाखल झाला. 498 कलमांतर्गत बायकोने नवऱ्याच्या आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबई उच्च न्यायालयात हा खटला दाखल झाला. आणि आज खंडपीठांत सुनावणी झाली यामध्ये पतीच्या बाजूने वकील कुशल यांनी सांगितले की पतीला दरमहा 80 हजार रुपये पगार मिळतो. परंतु घराचे लोन काढलेले असल्यामुळे दरमहा 60 हजार रुपये कर्जासाठी वजा होतात. परिणामी दरमहा दोन मुलांच्या देखभाल साठीची रक्कम आणि त्याशिवाय तडजोडीची रक्कम ही खूप जास्त होते.
मात्र बायकोच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील विजयालक्ष्मी अभान यांनी दावा केला की पत्नी काही कमवत नाही ती गृहिणी आहे. तिला तीन वर्षाचे एक आणि एक वर्षाचे एक मुल आहे. या दोन्ही मुलांचा खर्च, घराचे भाडे त्यांचे आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च, त्यांचे पालन पोषण इतका सर्व खर्च आहे. ती सर्वस्वी नवऱ्यावर अवलंबून आहे. आणि नवऱ्याने तिची बाजू ऐकूनच घेतली नाही.
सासऱ्याने लैंगिक छळ केलाच नवऱ्याने देखील तिचा छळ केला. त्यामुळे एक रकमी 50 लाख रुपये नुकसानभरपाई आणि दरमहा 30,000 पेक्षा अधिक रक्कम घर खर्चासाठी दिली पाहिजे. नवऱ्याने बायकोचा छळ केला तिचे स्त्रीधन देखील तिला दिले नाही पतीने कोरोना काळात कोरोना झाल्याचे खोटे सांगितले. तिचे हक्काचे मिळालेलं सोने नाणे त्याने त्याकडे घेतले. मात्र त्याल कोरोना झालाच नव्हता.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर निर्देश दिले की पत्नी कमवत नाही 498 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. पतीला पगार दर महिना भरपूर आहे. त्याच्यावर जे काय लोन आहे असं तो सांगतो, त्याचा संबंध इथे येत नाही. त्याने तडजोड म्हणून एक रकमी पंचवीस लाख रुपये दोन्ही मुलांच्या देखभाली साठी दर महिना 12,000 रुपये पत्नीला दिले पाहिजेत. अद्यापही पत्नीने स्वतःसाठी पोटगी म्हणून अजून काही मागणीच केलेली नाही. त्यामुळे ही रक्कम फार नाही असे देखील न्यायालयाने म्हणले. आहे या संदर्भातील पुढील सुनावणी 24 जुलै रोजी निश्चित केली आहे.
हेही वाचा :