ETV Bharat / state

मुंबईत राष्ट्रवादीच्या नगरसेविका नादिया शेख यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोसिन शेख यांच्यावर बुधवारी रात्री तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला.

मोसिन शेख
author img

By

Published : Apr 25, 2019, 10:08 AM IST

मुंबई - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोसिन शेख यांच्यावर बुधवारी रात्री तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. स्थानिकांनी मोसिन शेख यांना जखमी अवस्थेत झेन रुग्णालयामध्ये दाखल केले. चाकू, तलवारीने हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

पोलीस घटनेची माहिती देताना

नादिया शेख देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक १४० च्या नगरसेविका आहेत. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मोसिन शेख यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्याची बातमी कळताच राष्ट्रवादी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मोसिन शेख यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हा हल्ला राजकीय हेतूने झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देवनार परिसरात घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून निवडणुकीच्या काळामध्ये हा हल्ला झाल्यामुळे या घटनेला राजकीय वळण मिळत आहे.

Intro:मुंबईतील देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोसिन शेख यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर हल्लेखोर जागेवरुन पळून गेले असता स्थानिकांनी मोसिन शेख यांना जखमी अवस्थेत झेन हॉस्पिटल मध्ये दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.हल्ल्याची बातमी कळताच राष्ट्रवादी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मोसिन शेख यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच हा हल्ला राजकीय हेतूने झाला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. Body:संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देवनार परिसरात घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागच कारण अस्पष्ट असून निवडणुकीच्या काळामध्ये हा हल्ला झाल्यामुळे त्याला राजकीय वळण मिळत आहे.

संजय दीना पाटील (लोकसभा उमेद्वार,राष्ट्रवादी काँग्रेस)

Byte
दिनेश देसाई (ACP)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.