ETV Bharat / state

तासवडे टोलनाक्यावर शेकडो बनावट ओळखपत्रांसह अंबर-लाल दिवे जप्त - Taswade tolnaka news

कराड नजिक तासवडे टोलनाक्यावर वर्षभरात अनेक बोगस अंबर-लाल दिवे आणि शेकडो बनावट ओळखपत्रे टोल व्यवस्थापनाने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या ओळखपत्रांमध्ये मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा), पोलीस आणि लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बनावट ओळखपत्रांचा समावेश आहे.

Fake ID card Taswade tolnaka
तासवडे टोलनाक्यावर शेकडो बनावट ओळखपत्रांसह अंबर-लाल दिवे जप्त
author img

By

Published : Dec 31, 2020, 4:39 PM IST

सातारा - कराड नजिक तासवडे टोलनाक्यावर वर्षभरात अनेक बोगस अंबर-लाल दिवे आणि शेकडो बनावट ओळखपत्रे टोल व्यवस्थापनाने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या ओळखपत्रांमध्ये मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा), पोलीस आणि लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बनावट ओळखपत्रांचा समावेश आहे.

माहिती देताना तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील

हेह वाचा - बांगलादेश मुक्ती लढ्याच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टोल चुकवण्यासाठी वाहनधारक खासगी वाहनावर पोलीस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, आमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष लिहितात. तसेच, व्हीआयपी सिम्बॉल वापरतात. शासकीय खात्यात वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी असल्याची बनावट ओळखपत्रे दाखवितात. गाडीत अंबर-लाल दिवे आणि पोलीस टोपी ठेऊन टोल व्यवस्थापनाची दिशाभूल करतात. त्यामुळे, टोल वसुलीत तफावत जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन टोलनाका व्यवस्थापनाने कडक धोरण राबवत वर्षभरात शेकडो बनावट ओळखपत्रे, बोगस लाल-अंबर दिवे जप्त केले आहेत. तसेच, काही जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल केले आहेत.

ओळखपत्र बनवून देण्याचा गोरखधंदा

तासवडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही टोलनाक्यावर टोल चुकविण्यासाठी वाहनधारकांनी अशा क्लुप्त्या केल्या आहेत. तसेच, टोल सवलतीसाठी बनावट ओळखपत्र बनवून देण्याचा गोरखधंदाही दोन्ही टोलनाक्यांच्या परिसरात सुरू होता. खुद्द टोल व्यवस्थापन पाहणार्‍या कंपनीचे देखील बनावट लेटरहेड आणि शिक्का तयार करण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा, टोल इनचार्ज नरेंद्र लिबे यांनी कर्मचार्‍यांच्या मदतीने कडक धोरण राबविण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेक वाहनधारकांकडे बनावट ओळखपत्रे आढळून आली. ती सर्व जप्त करण्यात आली असून काही जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्या आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

टोल प्रशासनाने वाहनधारकांकडून जप्त केलेली कागदपत्रे संबंधित खात्यांच्या प्रमुखांना सादर केली जाणार आहेत. जप्त करण्यात आलेल्या बनावट ओळखपत्रांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांची ओळखपत्रे सर्वाधिक आहेत, अशी माहिती तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

लाखो रुपयाचे वाहन आणि ७५ रुपयासाठी हुज्जत

लाखो रुपये किंमतीच्या वाहनातून फिरणारे 75 रुपयाच्या टोलसाठी व्यवस्थापनाशी वाद घालतात. मारामारीवर उतरतात. त्यामुळे, अनेकदा वाद घालणार्‍या वाहनधारकांवर पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली आहे. तसेच, काही जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. आलिशान गाडीतून प्रवास करणार्‍यांकडून वाद आणि मारामारीसारख्या घटना घडणे शोभत नाही, असे व्यवस्थापक रमेश शर्मा म्हणाले.

एका बहाद्दराकडून एनआयएचे बनावट ओळखपत्र जप्त

तासवडे टोलनाक्यावर एका बहाद्दराने तर कहरच केला. थेट एनआयएचा अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र त्याने दाखविले. व्यवस्थापक शर्मा यांना त्याचा संशय आला. त्यांनी उलट-सुलट प्रश्नांची सरबत्ती केली. परंतु, समोरचा व्यक्ती आपल्या म्हणण्यावर ठाम होता. अखेर त्याला तळबीड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एनआयएचा (राष्ट्रीय तपास यंत्रणा) अधिकारी म्हटल्यावर तळबीडच्या महिला पोलीस अधिकार्‍यानी डीवायएसपींना कळविले. ते सुद्धा तातडीने पोलीस ठाण्यात आले. हे प्रकरण आपल्या अंगलट तर येणार नाही ना, अशा शंकेमुळे त्यांनी देखील नरमाईची भुमिका घेतली. मात्र, शर्मा यांनी एनआयएच्या ट्विटर हँडलवर ट्विट केले. तसेच, एनआयएच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून खात्री केली. त्यावेळी त्या बोगस अधिकार्‍याचे बिंग फुटले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याची टाटा सफारी गाडी देखील जप्त करण्यात आली. आज अखेर ती गाडी तळबीड पोलीस ठाण्यात उभी आहे.

हेही वाचा - जीमला निघालेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.