मुंबई - देशातील निवडणुकीमध्ये पूर्वी मतदानासाठी आपल्याला हव्या त्या उमेदवाराच्या चिन्हाचा शिक्का मारुन चिठ्ठी मतदानपेटीत टाकली जात होती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मतदानासाठी इलेक्ट्रानिक वोटींग मशिन म्हणजेच 'ईव्हीएम' आले. अन् एक बटन दाबले की मतदान होऊ लागले. या आधुनिक उपकरणाचा वापर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही होत आहे. नेमकं मतदान होते तरी कसे? याचे प्रात्याक्षिक विलास चव्हाण या निवडणूक कर्मचाऱ्याने करुन दाखवले आहे.
हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त
देशातील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जात नसून त्या ईव्हीएम या आधुनिक तंत्रज्ञानावर २०११ पासून घेतल्या जातात. यानंतर ईव्हीएमवरील नागरिकांच्या शंका व आक्षेप यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने यात २०१८ पासून 'व्हीव्हीपॅट' हे प्रिंट चे तंत्रज्ञान जोडले. यामुळे मतदान कोणाला केले हे प्रिंट होते. ईव्हीएम मशीनवरील मतदानाने बोगस मतदान, मतपेट्या गहाळ अथवा चोरी होण्याचा धोका कमी झाला आहे.
प्रथम मतदार मतदान केंद्राकडे आल्यानंतर केंद्रांमध्ये मतदान निवडणूक कर्मचारी त्या मतदाराच्या ओळख पत्राची शहानिशा करतात. मतदान केंद्रावर एक कंट्रोल युनिट असते. त्यावरील कर्मचारी मतदारांची शहानिशा झाल्यानंतर मतदारास ईव्हीएम मशीनकडे जाण्यास सूचना करतो. त्या ठिकाणी मतदाराच्या व्यतिरीक्त कोणालाही जाऊ दिले जात नाही. त्याठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंग बंदी असते.
मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे त्या माहितीचा फलक ईव्हीएमवर असतो. त्यात प्रथम क्रमांक असतो त्याचे नाव, पक्षाचे चिन्ह यासमोर एक लाल रंगाचा लाईट असतो व निळ्या रंगाचे एक मोठे बटन असते त्या निळ्या रंगाच्या बटनवर मतदारांनी आपले बोट दाबल्यानंतर लाल रंगाचा लाइट चालू होतो. आणि ईव्हीएमवरील हिरव्या रंगाचा लाईट लागतो. ईव्हीएमच्या बाजूच्या व्हीव्हीपॅट मशीनवर उमेदवाराचा क्रमांक व त्यासमोरील बटन दाबले गेले. ते चिन्ह मशीनवर सात सेकंदाच्या कालावधीपर्यंत मतदाराला पाहता येते त्यानंतर मशीनमध्ये ते प्रिंट होते. यावेळी कंट्रोल युनिटवर बीप असा आवाज येतो व मतदान झाले असा संदेश कंट्रोल युनिट वरील कर्मचाऱ्यास समजतो व कंट्रोल युनिटवर लाल लाईट दर्शवली जाते अशाप्रकारे मतदान होते.
हेही वाचा - महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहणारा 'ईटीव्ही भारत'चा व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रसिद्ध