ETV Bharat / state

केंद्राच्या निधीअभावी हाफकिनमधील लस निर्मिती रखडली

परळ येथील हाफकिन संशोधन केंद्रात कोविड लस निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारच्या निधी अभावी, लस निर्मितीसाठी 2023 उजाडण्याची शक्यता आहे.

cहाफकिन
हाफकिन
author img

By

Published : May 17, 2022, 10:34 PM IST

मुंबई - राज्यात वाढत्या कोरोनाला ( Corona in Maharashtra ) प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कंबर कसली. त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याच्या सूचना करत लसीकरणावर भर दिला. राज्यभरात लसीकरणाची जोरदार मोहीम राबवली. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसींची कमतरता भासू लागली. केंद्राकडून ही लसींचा अपुरा पुरवठा होऊ लागल्याने हाफकीन इन्स्टिट्यूटला लस निर्मितीचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी ठेवला होता. केंद्र सरकारने लस निर्मितीला मान्यता दिली. सुमारे 22 कोटी 8 लाख डोस निर्मिती करणे शक्य होणार होते. मात्र, केंद्राच्या निधी अभावी लस निर्मिती कागदावर राहिली आहे.

लस निर्मिती खर्चिक - हाफकीनमध्ये भारत बायोटेक लसींच्या निर्मितीसाठी केंद्राकडून वर्षभराचा कालावधी मिळाला. लस तयार करण्याची यंत्रणा उभारणे खर्चिक असते. केंद्राकडे 287 कोटी तर राज्याकडे 154 कोटी आर्थिक तरतुदीचे प्रस्ताव पाठवले. त्यापैकी राज्य सरकारने 154 कोटींचा संपूर्ण निधी हाफकीनला दिला आहे. केंद्राकडून अद्याप निधी मिळालेला नाही. मुळात, लस निर्मिती करणे खर्चिक बाब आहे. त्यामुळे जोपर्यंत निधी मिळणार नाही, तोपर्यंत लस निर्मिती शक्य नाही, अशी माहिती हाफकीन संशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

निविदेला प्रतिसाद - हाफकीनमध्ये लस निर्मिती करण्यासाठी हाफकिन संशोधन केंद्राकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला. यातच ज्या कंपनीची निविदा आली. त्या कंपनीने जास्तीची बोली लावली. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या. तीन कंपन्यांनी याला प्रतिसाद दिला असून कंपनी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जोपर्यंत संपूर्ण निधी मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही कंपनीची नियुक्ती करणे शक्य नाही. त्यामुळे जेवढा प्रक्रियेला विलंब होईल, तेवढा लस निर्मितीला कालावधी लागेल. कदाचित, 2023 सुद्धा उजाडेल, असे संशोधन केंद्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा - Mumbai Corona Update: मुंबईत ७४ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.