मुंबई - परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलवली होती. या बैठकीत राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृह विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. काल रात्री आठ वाजता गृहमंत्री अनिल देशमुख हे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. त्याआधीच राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृह विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे सह्याद्री अतिथीगृहात आले होते. या तिघांमध्ये जवळपास तीन तास बैठक झाली.या बैठकीतून परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच न्यायालयात केलेल्या याचिकेला कायदेशीर उत्तर देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. येत्या 26 मार्चला या याचिकेवर सुनावणी असल्याने ही तातडीची बैठक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलावली होती.
हेही वाचा - 23 मार्च १९३१ : जाणून घ्या 'या' दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व
परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे खळबळ
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावलेले आहेत. महिन्याला मुंबईतील बार मालकांकडून अवैधरीत्या शंभर कोटी रुपये जमा करण्याचा आरोप या पत्रात लावले आहेत. राज्यभरात नाही तर देशभरात या पत्राची चर्चा सुरू आहे. त्यातच परमवीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच ही चौकशी लवकर करण्यात आली नाही तर, या घटनेसंदर्भातचे पुरावे नष्ट केले जाऊ शकतात अशाप्रकारच्या देखील शंका त्यांनी या याचिकेत व्यक्त केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या 26 मार्च तारखेला सुनावणी आहे.
हेही वाचा - मुंबईत तुरुंगातील वयोवृद्ध, आजारी कैद्यांचेही होणार लसीकरण