ETV Bharat / state

Mumbai Crime: हाय प्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली बनावट वेबसाईट; आरोपीला अटक - हायप्रोफाईल रिसॉर्टची बनावटी वेबसाइट

हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली बनावटी वेबसाईट तयार करून लाखोंची फसवणूक करण्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने एका आरोपीला अटक केली.

Mumbai Crime
बनावट वेबसाईट प्रकरण
author img

By

Published : Feb 7, 2023, 6:57 PM IST

मुंबई : दहिसर सायबर पोलिसांनी घाटकोपर पूर्व येथून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे आकाश रूपकुमार जाधव (23) आणि अविनाश जाधव (21) अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. एका फॅशन डिझायनरने दहिसर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तिने तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेबसाइटचा वापर करून विस्तारा स्टे रिसॉर्ट बुक केले. वेबसाईटवर नवीन वर्षात आकर्षक ऑफर्सचे आमीष देण्यात आले होते. हे पाहून डिझायनरने 3 दिवसांसाठी रिसॉर्ट बुक करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये ऑनलाइन जमा केले होते.

बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार : 28 डिसेंबर रोजी फिर्यादीने रिसॉर्टच्या जेवणाच्या मेन्यूबाबत विचारणा केली असता आरोपी सागर जाधव याने सांगितले की, आमच्या रिसॉर्टमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने रिसॉर्ट बंद केले आहे. त्यामुळे बुकिंगचे पैसे तो परत करणार; पण महिना उलटूनही पैसे परत न झाल्याने फॅशन डिझायनरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

20 हून अधिक लोकांची फसवणूक : तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी आकाश जाधव याला घाटकोपर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीचा दुसरा भाऊ अविनाश जाधव (21) याचाही समावेश असून, त्याच्यावर 17 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सायबर अधिकारी अंकुश दांडगे यांनी सांगितले की, या दोन्ही भावांनी हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाने दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लाखो रुपये घेतले. यानंतर लोकांना पैसे परत केले नाहीत. या दोघांनी मिळून 20 हून अधिक लोकांची फसवणूक केली आहे.

यापूर्वीही फसवणुकीचे प्रकार : मुंबईतील एका महिलेची अशाच प्रकारची फसवणूक पूर्वी झाली आहे. देहरादून येथील एका व्यापाराची फसवणूक केल्याची घटना 4 एप्रिल, 2022 रोजी घडली होती. महिलेने व्यापाऱ्याबरोबर जमिनीचे शासकीय करार पत्र बनवून त्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. पीडितच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आणखी एका घटनेत पोस्टात पैसे जमा करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नी ​​बंटी आणि बबली यांना मुंबईच्या दिंडोसी पोलिसांनी 10 मे, 2022 रोजी सुरत येथून अटक केली होती.

हेही वाचा : Mumbai Airport Threat Call : मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची धमकी; इंडियन मुजाहिद्दीनच्या नावाने धमकीचा फोन आल्याने खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.