ETV Bharat / state

Dindoshi station : स्थानकाचे नाव बदलणारी जनहित याचिका; याचिकाकर्त्यांना न्यायालयाने सुनावले खडेबोल - स्थानकाचे नाव बदलणारी जनहित याचिका

एखादा स्थानकाचे नाव बदलणे ही जनहित याचिका कशी करता येईल ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित करत याचिकाकर्त्यांला खडेबोल सुनावले आहे. दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी ( Hearing in Bombay High Court ) होणार आहे.

High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Dec 6, 2022, 8:48 AM IST

मुंबई : मुंबईतील मेट्रो रेल्वे दिंडोशी स्थानकाचे नाव बदलून पठाण वाडी करण्यात यावे, याकरिता दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी ( Hearing in Bombay High Court ) दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता ( Chief Justice Dipankar Dutta ) यांनी याचिकाकर्त्यांला विचारले की एखादा स्थानकाचे नाव बदलणे ही जनहित याचिका कशी करता येईल ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित करत याचिकाकर्त्यांला खडेबोल सुनावले आहे.

न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल : मेट्रो स्थानकाचे नामकरण किंवा पुनर्नामकरण करण्यासाठी जनहित याचिका कशी करता येईल ? मेट्रो स्थानकाच्या नामकरणाबाबतचे धोरण लागू करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का ? अशा शब्दात खंडपीठाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो 7 च्या मार्गिकेची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा कडून वेगाने सुरू आहेत. या मार्गावरील मालाड पूर्व येथील मेट्रो स्थानकाला दिंडोशी नाव देण्यात आल्याने नई रोशनी या सेवाभावी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. 2010 मध्ये केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित केले होते. मात्र 2020 रोजी एमएमआरडीएच्या आयुक्तांनी राजकीय दबावापोटी स्थानकाचे नाव दिंडोशी केले.

खंडपीठासमोर सुनावणी पडली पार : एमएमआरडीच्या नियमानुसार एखाद्या ठिकाणी दोन मेट्रो स्थानके येणार असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा अतिपरिचित नाव देण्यात येते. त्यासाठी तेथील वाडी पाडे यांचा विचार केला जातो. मेट्रो 2 मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो 7 च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

याचिकाकर्त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाले आहे ? स्थानकाच्या नामकरणासाठी जनहित याचिका कशी केली जाऊ शकते ? त्यामुळे कोणते जनहित साध्य होईल ? मेट्रो स्थानकाच्या नामकरणाबाबतचे धोरण लागू करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का? असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले. तसेच या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाले आहे ? ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या असे आदेशही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. स्थानकांची नावे निश्चित करण्यासारखी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले.

काय आहे याचिके : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व यादरम्यान मेट्रो7 चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एमएमआरडीए सुरू आहे. या मार्गावरील मालाड पूर्व येथील स्थानकाला दिंडोशी नाव दिलेले आहे. याविरोधात नई रोशनी या सामाजिक संस्थेने न्यायालयात जनहित याचिका केली आहे. सन 2010 मध्ये केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित केले होते. येथील पठाणवाडी परिसरावरून हे नाव दिले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीए आयुक्तांनी राजकीय दबावापोटी स्थानकाचे नाव दिंडोशी केले असा दावा याचिकेत केला आहे. एमएमआरडीच्या नियमानुसार एखाद्या परिसरात दोन मेट्रो स्थानके असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा अतिपरिचित नाव स्थानकाला द्यायला हवे. मेट्रो 2 मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो 7 च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. याशिवाय येथे असलेल्या एका उड्डाणपुलालादेखील पठाणवाडी नावाने ओळखले जाते. त्यामुळे मेट्रो स्थानकाला पठाणवाडी असे नाव द्यावे अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.