ETV Bharat / state

दोन कोटी मराठा आंदोलकांमुळे हाहाकार माजेल; आंदोलन मुंबईत नको, उच्च न्यायालयात याचिका - मराठा आंदोलन

Hemant Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र त्यापूर्वीच आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Maratha Reservation
आंदोलन मुंबईत नको, उच्च न्यायालयात याचिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 6:38 PM IST

माहिती सांगताना हेमंत पाटील

मुंबई Hemant Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घरात, गल्लीत आंदोलने केली. तसंच ठिकठिकाणी मेळावे देखील घेतले. मात्र मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन करू नये. कारण दोन कोटी जनता जर मुंबईत आंदोलन करायला आली तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास वेळ लागणार नाही. त्याचबरोबर मुंबईत हाहाकार माजेल अशा प्रकारची याचिका, हेमंत पाटील यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

नेत्यांना केली गावबंदी : राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या समस्येवर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर सर्व मराठा आंदोलन करत आहेत. प्रत्येक गावामध्ये नेत्यांना गावबंदी मराठा आरक्षणासाठी केली गेली. अनेक नेत्यांना गावबंदी झाली. प्रत्येक गावात गल्लीत मेळावे झाले. त्यावर शासनाने सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र मुंबईत आंदोलन करण्याला फक्त विरोध आहे, हे आंदोलन मुंबईत न घेता इतरत्र कुठेतरी घ्यावं. कारण मुंबई मधील वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था यामुळं बिघडून जाईल, असा मुद्दा मांडत हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

दोन कोटी लोक कोठे सामावतील : याचिकेमध्ये हा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला की, राज्यात गेल्या 60-70 वर्षात मुंबईत अनेक आंदोलनं झालीत. आझाद मैदानामध्ये सातत्याने आंदोलन करण्याची परंपरा आहे. ती ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे. मात्र आझाद मैदानामध्ये दोन कोटी लोक कुठून आणि कसे येतील. तसंच कोणत्या प्रकारे येतील आणि आझाद मैदानची तेवढी क्षमता नाही. त्यामुळं येथे कायदा सुव्यवस्था मोडकळीस येऊ शकते, असं देखील याचिकेमध्ये पाटील यांनी नमूद केलंय.

मागणीला विरोध नाही आमचा पद्धतीला विरोध : महाराष्ट्र शासनाने 54 लाख पेक्षा अधिक मराठा जातीच्या व्यक्तींना कुणबी दाखले देखील दिले आहेत. त्यांची नोंद सापडली असल्याचं देखील सांगितलं आहे. परंतु शासन ठोस निर्णय घेत नाही. म्हणूनच राज्यातील तमाम मराठा जातीच्या लोकांना घेऊन कोट्यवधी लोक मुंबईत आंदोलनासाठी येत असल्याची हाक, मनोज जरांगे यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर याचिका मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केली आहे. त्यांचा दावा आहे की, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आंदोलन मुंबईत करण्याला विरोध आहे. म्हणून मुंबईत हे आंदोलन होऊ नये अशी मागणी आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात येत्या 3 दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल का केली : या संदर्भात हेमंत पाटील यांनी सांगितलं की, मुंबईत दोन कोटी जनता मराठा आरक्षणाकरता आंदोलनासाठी येत आहे. आझाद मैदानामध्ये असंख्य आंदोलने झाली. परंतु दोन कोटी जनता कुठून येईल कशी येईल? आझाद मैदानाची क्षमता तशी आहे का? परंतु यामुळं कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीच येईल. मुंबईत हाहाकार माजेल समाजामध्ये तेढ निर्माण होईल.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही, मनोज जरांगेंची गर्जना
  2. ठरलं! मनोज जरांगे पाटलांचं मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण; सरकारला दिला इशारा
  3. मराठा आरक्षण आंदोलन; अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी, पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस केले जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.