मुंबई - हवामान विभागाने मुंबईत रात्री तीन तासात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्र जागून काढावी लागली. रात्री तीन नंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या ठिकाणी साचले पाणी -
शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. काल शनिवारी रात्री ८ ते मध्यरात्रीच्या २ वाजेपर्यंत सहा तासात शहर विभागात १५६.९४, पूर्व उपनगरात १४३.१४, पश्चिम उपनगरात १२५.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सहा तासात शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने ब्रीच कॅंडी, भांडुप, भायखळा, आग्रीपाडा, ग्रँट रोड, जेजे हॉस्पिटल, हिंदमाता, किंग सर्कल, लालबाग, माटुंगा, मुलुंड, परेल, माहीम, नळ बाजार, साकी नाका, अंधेरी, सायन, बांद्रा आदी बहुतेक सर्वच सखल भागात पाणी साचले.
हेही वाचा - आई बनली दुर्गा! बिबट्याच्या जबड्यातून ५ वर्षीय लेकीला वाचवलं
हेही वाचा - Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते जलमय; अनेक घरात घुसले पाणी