ETV Bharat / state

Hrishikesh Deshmukh : ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाही; पुढील सुनावणी 4 डिसेंबरला - ऋषिकेश देशमुख ईडी नोटीस

ईडीने ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाने अद्याप दिलासा दिलेला नसून पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. (hearing on hrishikesh deshmukh application for pre-arrest bail) 100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस (hrishikesh deshmukh ed notice) बजावली होती.

Hrishikesh Deshmukh
ऋषिकेश देशमुख बातमी
author img

By

Published : Nov 22, 2021, 3:19 PM IST

Updated : Nov 22, 2021, 3:50 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस (hrishikesh deshmukh ed notice) बजावली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात न जाता त्यांनी विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर त्यांना न्यायालयाने अद्याप दिलासा दिलेला नसून पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. (hearing on hrishikesh deshmukh application for pre-arrest bail)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज विशेष न्यायालयाने कुठलाही निर्णय न देता 4 डिसेंबर डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. ईडीकडून ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ई़डी कार्यालयात हजेरी न लावता अटकपूर्व जामीन करता ऋषिकेश देशमुख यांनी अर्ज केला होता.

हेही वाचा - 'त्या' घटनेवर तथाकथित सेक्युलर नेता का बोलत नाही? देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न

ऋषिकेश देशमुख यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार ऋषिकेश यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीदरम्यान कदाचित त्यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते. या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी ऋषिकश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाला आता दुसऱ्यांदा पुढची तारीख मिळाली आहे. आता या जामीन अर्जावर चार डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऋषिकेश यांना 4 डिसेंबरपर्यंत अप्रत्यक्षरित्या अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. कारण हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट्य असल्याने देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले तरी त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

Last Updated : Nov 22, 2021, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.