ETV Bharat / state

Corona Patients Increase : सावधान! 'या' कारणामुळे वाढत आहेत कोरोना विषाणूचे रुग्ण, काळजी घेण्याच्या सूचना - Corona Patients Update

कोरोनाचा एखादा नवा व्हेरियंट आला असावा किंवा अँटीबॉडीज स्थर खालावला असावा त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत असावी अशी शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे. रूग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Corona Patients Increase
कोरोना
author img

By

Published : Mar 26, 2023, 9:47 PM IST

डॉ. भरत जगियासी माहिती देतांना

मुंबई : जगभरात हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार तीन वर्षानंतरही कायम आहे. मार्च पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रुग्णसंख्या रोजच वाढू लागली आहे. कोरोनाचा एखादा नवा व्हेरियंट आला असावा किंवा अँटीबॉडीज स्थर खालावला असावा त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत असावी, अशी शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे.

कोरोना पुन्हा वाढतोय : कोरोनाचा पहिला रुग्ण 2020 मध्ये आढळून आल्यापासून गेले तीन वर्षे आरोग्य विभाग कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे काम करत आहे. या कालावधीत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. या तीन लाटा परतवून लावण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. गेले काही महिने रुग्ण संख्या स्थिर होती. त्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आणि मार्चपासून पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रोज रुग्णसंख्या वाढत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

अँटीबॉडीजचा स्थर खालावला : कोरोनाने आपल्यामध्ये सतत बदल घडवले आहेत. आतापर्यंत कोरोनाचे अनेक व्हेरियंट आढळून आले आहेत. या व्हेरियंट मुळे त्या त्या वेळी रुग्णसंख्या वाढलेली दिसली आहे. आताही एखादा नवीन व्हेरियंट असावा. तसेच नागरिकांनी कोरोना विरोधातील लस घेऊन सुमारे दिड वर्षाचा कालावधी झाला आहे. या कालावधीत लसीमुळे निर्माण झालेल्या अँटीबॉडीजचा स्थर खालावला असावा. एखादा आजार वाढल्यास मानवाच्या पेशींमधील स्मृतीमध्ये असलेल्या अँटीबॉडीज पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतात. यासाठी काही कालावधी जायला लागतो. आताही काही वेळ लागेल तो पर्यंत रुग्णसंख्या वाढेल. मात्र, अँटीबॉडीज ऍक्टिव्ह झाल्यानंतर रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली.

यांनी काळजी घ्यावी : सुरुवातीला कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू मोठ्या संख्येने होत होता. नंतर कालांतराने मृत्यूची संख्या आटोक्यात येऊ लागली. माणसाच्या शरीरात शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोनाने मृत्य होण्याचे प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला किंवा त्याच्या नव्या व्हिरियांला घाबरण्याची गरज नाही. वयोवृद्ध नागरिक, विविध गंभीर आजार असलेले रुग्ण, गरोदर महिला फुफ्फुस तसेच श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आदींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. जगियासी यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी : कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. रुग्णांच्या संपर्कात आल्याने तो आजार पसरतो. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हात वारंवार धुवावे. भरपूर पाणी प्यावे, शिंकताना व खोकताना रुमालचा वापर करावा, ताप सर्दी खोकला घश्यात खवखव यासारखी कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्यात रुग्णसंख्या वाढतेय : काल राज्यात 437 तर मुंबईमध्ये 105 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात दोन दिवसात कोरोनामुळे 5 मृत्यूंची नोंद झाली आहे. दोन दिवसापूर्वी ठाण्यात तीन, काल कोल्हापूर व औरंगाबाद येथे प्रत्येकी एक अशा पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : Covid During Pregnancy : कोरोना संसर्गाने बाधित गरोदर मातेच्या मुलाला होतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आजाराचा धोका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.