ETV Bharat / state

भायखळा रेल्वे रुग्णालयात कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य सहाय्यक 'रोबोट' दाखल - भायखळा रेल्वे रूग्णालय न्यूज

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला येथील ईएमयू कारशेडमध्ये कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी आरोग्य सहाय्यक रोबोट रक्षक पूर्णपणे इनहाऊस बनवण्यात आला आहे. तो रक्षक रेल्वेच्या भायखळा येथील डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सहायक म्हणून दाखल झाला आहे.

Health assistant 'robot' at Byculla railway hospital in mumbai
भायखळा रेल्वे रूग्णालयात आरोग्य सहाय्यक 'रोबोट' दाखल
author img

By

Published : Jul 29, 2020, 3:58 PM IST

Updated : Aug 7, 2020, 4:30 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला येथील ईएमयू कारशेडमध्ये कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी आरोग्य सहाय्यक रोबोट रक्षक पूर्णपणे इनहाऊस बनवण्यात आला आहे. तो रक्षक रेल्वेच्या भायखळा येथील डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सहायक म्हणून दाखल झाला आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, शलभ गोएल यांनी आज (बुधुवार) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भायखळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय संचालिका डॉ. मीरा अरोरा यांच्याकडे हा रोबोट 'रक्षक' सुपूर्द केला. कुर्ला ईएमयू कारशेडमधील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता, सुनील बैरवा आणि त्यांच्या समर्पित टिमने याची रचना इनहाऊस केली आहे.

हा वैद्यकीय सहाय्य दूरस्थपणे डॉक्टर आणि रूग्णांमधील संवाद साध्य करण्यासाठी कार्यक्षमपणे तयार केला गेला आहे. हे रोबोट तापमान, नाडी, ऑक्सिजन टक्केवारी सारख्या आरोग्याचे मापदंड मोजू शकते आणि स्वयंचलित सॅनिटायझर, इन्फ्रारेड सेन्सर यांतून बाहेर येते. 'रक्षक' रूग्णांना औषध, भोजन पोहोचवू शकतो आणि डॉक्टर आणि रूग्णामध्ये एकमेकांशी व्हिडिओ संवाद होऊ शकतो. हे 150 मीटर अंतरापर्यंत रिमोट ऑपरेशनद्वारे सम पातळीच्या पृष्ठभागावर सर्व दिशेने जाऊ शकते.

पूर्ण चार्ज झालेल्या बॅटरीसह, हे सतत 6 तास कार्य करू शकते आणि ट्रेमध्ये 10 किलो पर्यंतच्या वस्तूची वाहतूक करू शकते. हे वायफाय वर आधारित आहे. त्यामुळे मोबाईल डेटाची आवश्यकता नाही. ॲन्ड्रॉइड मोबाइलद्वारे ऑपरेट होते. रुग्णांचा व्हिडिओ आणि छायाचित्रण (स्नॅप शॉट्स) देखील डाउनलोड करता येतात.

Last Updated : Aug 7, 2020, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.