ETV Bharat / state

HC Grant Bail To Terror Accused : रिक्षाचालक दहशतवाद्याचा टेलरच्या घरात मुक्काम; अमेरिकेतून जमा झाले पैसे, मग...

दहशतवादी कारवायात असलेल्या रिक्षाचालकाला आपल्या घरात मुक्काम करु दिल्यानं वांद्र्यातील टेलरच्या दहशतवादविरोधी पथकानं मुसक्या आवळल्या होत्या. या टेलरच्या खात्यात अमेरिकेतून पैसे जमा झाले होते. त्यामुळे दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी इरफान शेखवर केला होता. मात्र न्यायालयानं सबळ पुराव्या अभावी इरफान शेखला जामीन मंजूर केला.

HC Grant Bail To Terror Accused
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 11:19 AM IST

मुंबई HC Grant Bail To Terror Accused : दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या आरोपावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेनं वांद्य्रातील टेलर इरफान शेखला अटक केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं इरफान शेखला जामीन मंजूर केला. त्याबाबतची महत्त्वपूर्ण ऑर्डर सोमवारी न्यायालयानं जारी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं 2021 मध्ये झाकीर हुसेन तसेच इरफान शेखला अटक केली होती. मात्र या अटकेविरोधात इरफान शेखनं जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर बेकायदा प्रतिबंधात्मक कायदा युएपीए अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.

झाकीर हुसेनला घरात राहण्यासाठी दिली जागा : इरफान शेखनं गुन्हेगार असलेल्या झाकीर हुसेनला आपल्या घरात राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. झाकीर त्याच्या घरी आल्यानंतर त्याला काही पैसे देऊन मदत केल्याचाही आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणांनी इरफान शेखवर केला आहे. झाकीर सारख्या एका आरोपीला घरात लपण्यासाठी जागा दिली, त्यामुळे दहशतवादी गटामध्ये इरफान शेखचाही सहभाग असल्याचा राष्ट्रीय तपास एजन्सीचा आरोप होता.

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दाखल केला होता गुन्हा : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं युएपीए कायद्यांतर्गत मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात इरफान शेखवर गुन्हा नोंदवला होता. मात्र या खटल्यात तपास यंत्रणांचा इरफान शेखला जामीन नाकारण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचं तक्रारदाराचे वकील माजिद मेमन यांनी न्यायालयात सांगितलं. इरफान शेखबाबत आरोपपत्रात दाखल केलेल्या आरोपाबाबत कोणताही गुन्हा केल्याचं समोर येत नाही. त्याबाबत तपास यंत्रणेकडं कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. त्यामुळे गुन्हाच केला नसेल, तर जामीन मिळणं हा अधिकार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

अमेरिकेतून पन्नास हजार रुपये झाले बँकेत जमा : झाकीर हुसेन हा दहशतवादी कारवायात सहभागी होता, हे इरफान शेखला माहिती होते, असा आरोप तपास यंत्रणांनी केला. मात्र याबाबतचा एक देखील पुरावा राष्ट्रीय तपास यंत्रणा यात देऊ शकली नसल्याचं माजिद मेमन यांनी न्यायालयात सांगितलं. इरफान शेखला झाकीर हुसेनबाबत काही माहितीच नाही, तर त्याला जामीन मिळणं हा त्याचा हक्क असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोना काळात शासनानं लॉकडाउन जारी केला होता. त्यावेळेला रिक्षाचालक झाकीरच्या संपर्कात इरफान शेख आला. त्यामुळे झाकीरला 17 सप्टेंबर 2021 या दिवशी घरी मुक्काम करण्यास परवानगी दिली. झाकीर हुसेनचं पाकीट हरवल्याचं झकिरनं सांगितल्यानं अमेरिकेमधून पन्नास हजार रुपये स्वीकारण्यासाठी इरफान शेखच्या बँक खात्याचा तपशील दिला. मात्र पन्नास हजार रुपये झाकीरला तेव्हा हवे होते, असा दावाही यावेळी न्यायालयात करण्यात आला.

झाकीर हुसेनच्या दहशतवादी कारवायाबाबत नव्हती माहिती : इरफान शेखला झाकीर हुसेन हा दहशवादी कारवायामध्ये सहभागी असल्याचं माहिती नाही. त्याला माहिती असल्याचं दाखवणारा एकही पुरावा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दाखवला नाही. त्यामुळे इरफान शेखला जामीन मिळणं क्रमप्राप्त असल्याचं वकील माजिद मेनन यांनी न्यायालयाच्या समोर आणलं. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं अटकेत असलेल्या इरफान शेखला जामीन मंजूर केला.

हेही वाचा :

  1. Mumbai Bomb Blast Case : बाँबस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या साकिबचा मुलगा शमीलही दहशतवादी कृत्यात सहभागी
  2. Pune ISIS Module : पुण्यातील दहशतवाद्यांचे इसिसशी कनेक्शन, 'ही' संघटना कशी काम करते?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.