ETV Bharat / state

Mumbai HC On Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबईच्या सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हसीन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आज त्यांना दिलासा दिला.

Mumbai HC On Hasan Mushrif
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Jun 5, 2023, 4:38 PM IST

मुंबई: सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. कारण 'ईडी'च्या वतीने 40 पानांच्या पुरवणी अर्जामध्ये हसन मुश्रीफ यांना जामीन देऊ नये, अशी मागणी केली. हसन मुश्रीफ यांचा सर सेनाजी घोरपडे साखर कारखाना या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे त्यांना हा अंतरिम दिलासा मिळू नये, असे ईडीच्या वतीने बाजू मांडताना सांगितले होते. आज देखील हसन मुश्रीफ यांना दिलासा देण्यास 'ईडी'ने विरोध केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने गुणवत्तेच्या आधारे 20 जून पर्यंत अंतरिम दिलासा दिला. तसेच या मुदतीपर्यंत कोणतीही सक्तीने कारवाई करू नये, असे देखील न्यायालयाने म्हटले.

मुश्रीफ यांचा गुन्हा गंभीर: न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्यासमोर आज अंमलबजावणी संचालनालयाने 40 पानी याचिकेमध्ये ही बाब मांडलेली आहे. यामध्ये मुश्रीफ यांचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. 'मनी लॉंड्रिग केस'मध्ये त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे काही पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांना सत्र न्यायालयाने दिलेला जो अंतरिम दिलासा आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहे. म्हणूनच आम्ही त्या निकालाला आव्हान देत जामीन अर्जाला विरोध केला आहे, असे 'ईडी'चे ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांनी न्यायालयासमोर मांडले.

अखेर न्यायालयाकडून दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या न्यायाधीश अनुजा प्रभू देसाई यांनी याबाबत खटल्याच्या संदर्भातील सुनावणी 20 जून पर्यंत तहकूब केली. हसन मुश्रीफ यांनी जामीनासाठी घेतलेली उच्च न्यायालयातील धाव यशस्वी होते किंवा नाही हे 20 जून रोजीच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल.

हसन मुश्रिफांच्या साखर कारखान्यावर छापेमारी: ईडीकडून पुण्यात 3 एप्रिल, 2023 रोजी पुन्हा एकदा अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या साखर कारखाना मनी लाँडरींग प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. सोमवारी शहरात तब्बल नऊ ठिकाणी छापेमारी सत्र राबविले गेले. माजी मंत्री मुश्रीफ यांच्या व्यवसायिक भागीदार असलेल्या पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी आणि कंपन्यांच्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. याआधी देखील ईडीकडून पुण्यातील या व्यावसायिकाच्या घरी तसेच कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला आहे.

हेही वाचा:

  1. Amol Kolhe MP Candidate : ठरलं! 'या' मतदारसंघासाठी अमोल कोल्हे यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब
  2. Ajit Pawar on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर अजित पवारांची टीका; म्हणाले...
  3. Ajit Pawar : ...नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.