ETV Bharat / state

गुजराती व्यापारी मोदींना त्यांची जागा दाखवतील - हार्दिक पटेल - hardik

भाजप गुजरातमधील एका जागेसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तेव्हा व्यापारी मला कानात येऊन म्हणाला, असे नका बोलू, भाजपने कितीही खर्च केला तरी आम्ही काँग्रेसलाच मत देणार आहोत. असे बोलून तो निघून गेला. त्यामुळे हीच वेळ आहे मोदींना जागा दाखविण्याची, असे आवाहन हार्दिकने तरुणांना केले.

हार्दिक पटेल
author img

By

Published : Apr 8, 2019, 12:07 PM IST

मुंबई - गुजराती व्यापाऱ्यांनीच नरेंद्र मोदींना दिल्लीच्या सत्तेवर बसवले. पण, तेच व्यापारी आता त्यांनी त्यांची जागा दाखवतील, असे वक्तव्य नुकतेच काँग्रेसवासी झालेला पाटीदार नेत हार्दिक पटेलने केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे आयोजित युवा संमेलनात तो बोलत होता.

हार्दिक म्हणाला की, आज मुंबईला येताना मला मुंबईत काही गुजराती व्यापारी भेटले. त्यांनी मला देशाच्या निवडणुकीवर मत विचारले. तेव्हा मी म्हणालो की, काँग्रेस निवडून येणे अवघड आहे. कारण, भाजप गुजरातमधील एका जागेसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तेव्हा व्यापारी मला कानात येऊन म्हणाला, असे नका बोलू, भाजपने कितीही खर्च केला तरी आम्ही काँग्रेसलाच मत देणार आहोत. असे बोलून तो निघून गेला. त्यामुळे हीच वेळ आहे मोदींना जागा दाखविण्याची, असे आवाहन हार्दिकने तरुणांना केले.

यावेळी हार्दिकने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तो म्हणाला, भाजप लोकांच्या प्रश्नांवर बोलत नाही. राष्ट्रवादावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. जे लोक तरुणांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल बोलतात त्यांना देशद्रोही ठरवले जाते. त्यामुळे भाजपला सत्तेतून उलथून टाकण्याची गरज आहे. आज आपल्याला रोजगार, शिक्षण, सुरक्षा हवी आहे. यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे, असे पटेल म्हणाले. ज्या लेखकाने राजमाता जिजाऊंचा अपमान केला त्यांना या राज्यात पुरस्कार दिला जातो, असे म्हणून पटेलने फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले.

Intro:गुजराती व्यापारी मोदींना त्यांची जागा दाखवतील- हार्दिक पटेल
Body:गुजराती व्यापारी मोदींना त्यांची जागा दाखवतील- हार्दिक पटेल

(यासाठी अनिल निर्मळ यांनी live केले होते, त्यातील फुटेज घ्यावेत )

मुंबई, ता. 7 :
भाजपकडे आज प्रचंड पैसा असला तरी ज्यांनी मोदींना दिल्लीत पाठवले होते, तेच गुजराती व्यापारी मोदींना त्यांची जागा दाखवतील असा इशारा गुजरातमधील पाटीदार समाजाचे व काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आज मुंबईत दिला.
अंधेरी येथे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात काँग्रेसने युवा संमेलन आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते.
पटेल म्हणाले की, आज मुंबईला येताना मला मुंबईत व्यापार करणारे गुजराती व्यापारी विमानळावर भेटले. त्यांनी मला देशाच्या निवडणुकीवर मत विचारले, मी म्हणालो, भाजपकडे खूप पैसा आहे,
गुजरातमध्ये एका जागेवर 20 ते 25 कोटी खर्च करत आहे. देशात भाजपा असेच खर्च करणार असल्याने काँग्रेस येणे अवघड वाटते, त्यावर मला एक व्यापारी मला कानात येऊन म्हणाला, 'असे नका बोलू, भाजपाने कितीही खर्च केला तरी आम्ही काँग्रेसलाच मतं देणार आहोत, काँग्रेस पुढे निघून येईल' असे बोलून तो निघून गेला.त्यामुळे मी सांगतो आता हीच वेळ आली आहे, मोदीला त्यांची जागा दाखवण्याची तरुणांनी यासाठी आता पुढे यावे असे आवाहन पटेल यांनी करत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपने देशातील जनतेला फसवले आहे. आता ते लोकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, राष्ट्रवादावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. देशात जे लोक तरुण, शेतकरी यांच्यावर बोलत आहेत, त्यांना देशद्रोही बोलले जात आहे, त्यामुळे आता तरुणांनी जागे होण्याची गरज असून भाजपाला सत्तेतून उलथून टाका असेही आवाहन पटेल यांनी केले.
मोदींना काँग्रेसचा इतिहास माहीत नाही, त्यामुळे ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्रसंगी रक्त सांडले, बलिदान, दिले त्या सरदार पटेल,महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, लाला लजपतराय आदी नेत्यांचा मोदी अपमान करत आहेत. त्यांना याचे साधे भान उरले नाही. काँग्रेस ही सरदार-गांधी यांचा पक्ष आहे, या पक्षांकचा आम्हाला गर्व आहे. म्हणून अशा या पकशात पुन्हा देश घडविण्याची ताकत असल्याने मी यात आलो असल्याचे पटेल यांनी सांगितले. काँग्रेसने कधीही इंग्रजाची गुलामी केली नाही असे सांगत पटेल यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
आज देशातील प्रत्येक नागरिक, तरुण, संकटात सापडला आहे.आम्हाला आता बदलावे लागेल. आम्हाला आता रोजगार, शिक्षण आणि सुरक्षा हवी आहे. यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे.जे लोक तरुण, शेतकरी यांच्यावर बोलत आहेत, त्यांना देशद्रोही बोलले जात आहे, आता तरुणांनी जागे होण्याची गरज आहे. ज्यांनी माता जिजाऊ यांचा अपमान केला त्या साहित्यिकाला राज्यातल्या फडणवीस यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला.हे लोक इतिहास बदलत आहेत, आपली बदनामी करत आहेत.यामुळेच मी निवडणूक लढवू नये म्हणून माझ्या केसला इकडून तिकडे करत मला अडवण्यात आले.त्यामुळे देशातील युवा वर्गाने मोदी सरकारला उखडून टाकण्यासाठी सज्ज व्हावे, घराघरात जाऊन मोदींनी केलेल्या फसवणुकीवर बोलावे असे आवाहन पटेल यांनी केले.

Conclusion:गुजराती व्यापारी मोदींना त्यांची जागा दाखवतील- हार्दिक पटेल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.