ETV Bharat / state

'एमआयएमचा कार्यकर्ता आहे, तुमची वर्दी उतरवील'; पोलिसांना धमकी देणाऱ्यास अटक

रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा यांनी पोलिसांना “मैं एमआयएम का कार्यकर्ता हूं, हमारे कुर्ला पाईपलाइन रोड की दुकान बंद मत करो. तुम सबकी वर्दी उतार दूंगा” अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घातली. दरम्यान, याप्रकरणी सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : May 2, 2020, 7:07 PM IST

'एमआयएमचा कार्यकर्ता आहे, तुमची वर्दी उतरवील'; पोलिसांना धमकी देणाऱ्यास अटक
'एमआयएमचा कार्यकर्ता आहे, तुमची वर्दी उतरवील'; पोलिसांना धमकी देणाऱ्यास अटक

मुंबई - कोरोना संकट उभे राहिले असताना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, यासाठी पोलीस झटत आहेत. मात्र, अनेकदा आवाहन करणाऱ्या पोलिसांनाच नागरिकांच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागत आहे. अचानक हल्ला होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

29 तारखेला सायंकाळी कुर्ला पश्चिम पाईपलाईन रोडवर काही दुकाने सुरूच असल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसले. यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले व त्यांनी रितसर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, जमावातील रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा यांनी पोलिसांना “मैं एमआयएम का कार्यकर्ता हूं, हमारे कुर्ला पाईपलाइन रोड की दुकान बंद मत करो. तुम सबकी वर्दी उतार दूंगा” अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घातली. दरम्यान, याप्रकरणी सदर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच प्रादुर्भाव मुंबईत वाढत असल्याने मुंबई पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून दिवस-रात्र नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. कुर्ला पाईपलाईन रोडवरील वफाती लेन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून खिडकीच्या बाहेर हाताचा इशारा करत रिझवान जुबेर हा पोलिसांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होता. वर्दी उतरवण्याची धमकी देत होता. तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. हे पाहून पोलिसांनी रिझवान जुबेरवर कारवाई करण्याकरिता पुढे येताच जमावाने पोलिसांना बाजूला करत हुसकावले. हा व्हीडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.