पालघर - विरारनजीक वृद्धाश्रमाला तोक्तेचा तडाख्यात मोठे नुकसान झाले असून, या वृद्धाश्रमातील आज्जीबाईंनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साद घालताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तातडीने पंचनामे करून लागलीच नुकसानात तुटलेल्या व उडून गेलेल्या पत्र्यांच्या जागी नवीन कोरे सिमेंटचे पत्रे चढविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे वृद्धाश्रमात आश्रयाला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे सध्या या वृद्धाश्रमात आश्रयाला आहेत. वादळांन अनेकांचं नुकसान केले आहे. वसई-विरार परिसरात या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला, फळबागा, शेती प्रमाणे अनेकांच्या घरांचं देखील नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिकविणाऱ्या शिक्षिका यांना देखील या वादळाचा फटका बसलेला आहे. राज्याचा मुख्यमंत्री ज्यांनी घडविला , राज ठाकरे यांना ज्यांनी शिकवलं अशा शिक्षिका वसईतील सध्या तुटलेल्या पत्र्याचा आधार घेऊन दिवस काढत आहेत.
वादळात उडाले वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे
सुमन लक्ष्मण रणदिवे या शिक्षिका यांनी अनेक राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहे. सुमन रणदिवे या सध्या वसई परिसरातील सत्पाळा गावाजवळील जेलाडी येथील राजेश मोरे व सुवर्णा मोरे या दांम्पत्यांच्या न्यू लाईफ केअर फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमात आहेत. सोमवारी आलेल्या वादळात या वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले आहेत, सुमन यांच्यासारखे तब्बल 29 वृद्ध येथे राहतात. अचानक वादळ आलं त्यामुळे या वादळात सर्व वयोवृद्ध त्यांचे कपडे, वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले त्यांच्या जवळील सामान त्यांची कागदपत्र सर्व या पावसात भिजलेले आहेत. वादळ थांबून आठ दिवस झाले आहे मात्र या आश्रमात अद्याप पत्रेही लागले नाहीत, जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचं आश्रमाच्या संचालकांनी सांगितलेला आहे.
तातडीने वृद्धाश्रमाचे तुटलेले पत्रे देणार
धवारी वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी सदर वृद्धाश्रमाला भेट देत पाहणी केली .या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून लवकरच नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच तातडीने वृद्धाश्रमाचे तुटलेले पत्रे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.