ETV Bharat / state

Gram Panchayat Elections 2023 : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी

Gram Panchayat Elections 2023 : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडलं. काही ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Gram Panchayat Elections 2023
Gram Panchayat Elections 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 10:42 PM IST

मुंबई Gram Panchayat Elections 2023 : नांदेड जिल्‍ह्यातील 19 ग्रामपंचायतींमध्ये सर्वात्रिक तसंच 25 जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 81.37 टक्के मतदान झालं. उद्या सोमवारी (6 नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळं गुलाल कोण उधळणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय.

मांडळमध्ये दोन गटात वाद : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मांडळमध्ये दोन गटात वाद झाला. दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी मतदारांच्या उमेदवाराच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानं दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद मिटला.

अहमदनगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी मतदान : अहमदनगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं सर्व 732 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पडलं. जिल्ह्यात 1 हजार 701 सदस्यपदासाठी 3 हजार 995 उमेदवारांचे तर सरपंचपदासाठी 610 उमेदवारांचं भवितव्यही मतपेट्यात बंद झालंय.

नक्षलग्रस्त भागातही मतदानाचा उत्साह : गोंदियातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातही नक्षलग्रस्त भागात मतदारांचा उत्साह दिसून आला. येरंडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 88 टक्के मतदान झालं. गोंदियातील इतर तीन ठिकाणीही मतदान शांततेत पार पडलं.

नागपूर जिल्ह्यातील 375 ग्रामपंचायतींच्या निवडणुका : जिल्ह्यातील 375 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसंच 5 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आज पार पडल्या. काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडली. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी मतदान : पालघर जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. त्यापैकी 51 सार्वत्रिक तसंच 49 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. 628 जागांसाठी तब्बल 2 हजारह 99 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील टेंभी खोडवे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झालीय.

बुलढाण्यात 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान : बुलडाण्यात 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान उत्साहात पार पडलं. मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.