मुंबई : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची ( Gram panchayat Election ) रणधुमाळी सुरू आहे. आज रविवारी राज्यातील 7 हजार 682 निवडणूकींसाठी मतदान प्रक्रिया ( Voting process completed ) पार पडली. या मतदान प्रक्रियेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल येत्या 20 डिसेंबर रोजी लागणार असून उमेदवारांमध्ये उत्सुकता लागली आहे. राज्यात सर्वाधिक मतदान रायगड जिल्ह्यात 70.82 टक्के झाले आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये झाली निवडणूक -महाराष्ट्रातील ७,१३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ७४ टक्के मतदान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 दरम्यान मतदान झाले, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ठाणे (35), पालघर (62), रायगड (191), रत्नागिरी (163), सिंधुदुर्ग (291), नाशिक (188), धुळे (118), जळगाव (122), अहमदनगर (195), नंदुरबार(117), पुणे (176), सोलापूर (169) आणि सातारा (259) या ग्रामपंचायतींमध्ये आज निवडणूक झाली आहे.
सांगली (416), कोल्हापूर (429), औरंगाबाद (208), बीड (671), नांदेड (160), उस्मानाबाद (165), परभणी (119), जालना (254), लातूर (338), हिंगोली (61), अमरावती (252), अकोला (265), यवतमाळ (93), बुलढाणा (261), वाशीम (280), नागपूर (234), वर्धा (111), चंद्रपूर (58) भंडारा (304), गोंदिया (345), गडचिरोली (345) (२५).
ग्रामपंचायत निवडणूकच्या मतदानाची टक्केवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत सर्वाधिक रायगड जिल्ह्यात सुमारे 70.82 टक्के मतदान झाले आहे. तर धुळे जिल्हा 65.90 टक्के, अकोला जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींसाठी 60.60 टक्के मतदान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 59.08 टक्के, भंडारा जिल्ह्यात 303 ग्रामपंचायतीसाठी 64.62 टक्के, वर्धा जिल्ह्यात 113 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी 66.17 टक्के, जळगाव जिल्ह्यात 68.58 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 93 ग्रामपंचायतीसाठी 60.45 टक्के तर अहमदनगर जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतीसाठी 69.42 टक्के झाले आहे.
धनंजय मुंडेंनी केले मतदान : बीड जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे मतदान प्रक्रिया सुरू आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथरा या गावी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. गावाचा विकासासाठी आम्ही गावात सर्वानुमते बिनविरोध निवड करत असतो. त्या संदर्भात गावातील जेष्ठ मंडळी निर्णय घेतात आणि त्याचा स्वीकार करतो. गावचा विकास साधण्यासाठी एक पॅनलमध्ये आलो, असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. तसेच सर्वाधिक मताधिक्याने ग्रामपंचायती या राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यात मतदानावरून वाद : बीड तालुक्यातील डोईफोडवाडी गावात ग्रामपंचायत मतदानावरून वाद दोन गटात तुफान वाद झाल्याची घटना घडली आहे. बोगस मतदान करण्याच्या आरोपावरून दोन गट आमाने-सामने आल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ गावात शांतेचे वातावरण तयार झाले.
ईव्हीएम मशीनमध्ये केला बिघाड : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावातील प्रभाग 2 मधील ईव्हीएम मशीन मध्ये जाणीवपूर्वक बिघाड केल्याची तक्रार गणेश वाणी यांनी केली आहे. प्रभाग 2 मध्ये अशोक वाणी हे सरपंच पदाचे उमेदवार असून यांची निशाणी शिट्टी असून याच ईव्हीएम मशीनमध्ये जाणीवपूर्वक काहीतरी चिकट द्रव टाकल्यामुळे मशीन बंद पडले. यामुळे तब्बल एक ते दीड तास त्या ठिकाणी मतदान करता आले नाही. जाणिवपूर्वक शिट्टी चिन्हावर मतदान होऊ नये, याच्यासाठी हा प्रकार केला असल्याचा आरोप गणेश वाणी यांनी केला आहे.
104 वर्षीय मतदाराने बजावला हक्क : बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील मतदान केंद्रावर 104 वर्षाच्या महाराजांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ह.भ.प.रघूनाथ महाराज चौधरी असे मतदानाचा हक्क बजावलेल्या महाराजांचे नाव आहे. तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत, लोकशाहीला बळकटी द्यावी. असे आवाहन ह.भ.प.रघूनाथ महाराज चौधरी यांनी केले आहे.
मतदान केंद्र दुसऱ्या गावात नेल्याने गावकरी आक्रमक : मतदान केंद्र दुसऱ्या ठिकाणी नेल्याने गावकऱ्यानी गावातच ठिया करतं मतदानावर बहिष्कार टाकला. बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेंगडेवाडी आणि जाधववाडी या गावात गेल्या 25 वर्षापासून मतदानाचे केंद्र बूथ होते. मात्र यावर्षी प्रशासनाने अचानक बूथ चऱ्हाटा गावात नेल्याने मेंगडेवाडी गावातील मतदारांनी गावातच ठिया करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, यावेळी प्रशासना विरोधात घोषणाबाजी कराण्यात आली.