ETV Bharat / state

Mangal Prabhat Lodha : आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेची काळजी सरकार घेणार - मंगल प्रभात लोढा - Mangal Prabhat Lodha

आंतरजातीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार एक विशेष समिती स्थापन करणार आहे. दहा सदस्यांची समिती स्थापन करणार ( ten members committee will be formed ) असून मुला-मुलींशी साधला जाणार संवाद साधला जाणार आहे असे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

MANGAL PRABHAT LODHA
मंगल प्रभात लोढा
author img

By

Published : Dec 10, 2022, 5:43 PM IST

मुंबई :

मंगल प्रभात लोढा

आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेकरता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला ( Shinde Fadnavis government Big decision )आहे. येत्या ७ ते १० दिवसांत सरकारकडून १० सदस्यीय समिती नेमण्यात येणार ( ten members committee will be formed ) आहे. या समितीकडून आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मुंबईत ते बोलत होते.

दहा सदस्यांची समिती स्थापन करणार : आंतरजातीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार एक विशेष समिती स्थापन करणार आहे. तसेच आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याबाबत ही समिती माहिती घेणार आहे. येत्या सात दिवसात दहा सदस्यांची समिती स्थापन करणार असून ही समिती आंतरधर्मीय प्रेमप्रकरणामुळे ज्या मुली कुटुंबापासून दूर गेलेल्या आहेत त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार तसेच या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचेही मंत्री, मंगल प्रभात लोढा यांनी ( Women and Child Development Minister Mangal Prabhat Lodha ) सांगितले आहे.

मुला-मुलींशी साधला जाणार संवाद : एकीकडे श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकार भविष्यात टाळण्याकरता लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. परंतु या कायद्याआधीच सरकार १० सदस्यीय समिती नेमणार आहे. या समितीतून कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या मुलामुलींशी ही समिती संवाद साधणार ( Communication with boys and girls ) आहे. तसंच, गरज पडल्यास त्यांना मदतही करणार आहे.

लव्ह जिहाद विरोधी कायदा : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा ( Anti Love Jihad Act ) करण्याची मागणी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कायद्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा लागू होण्याची शक्यता आहे. राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याकरता सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी विविध राज्यातील कायद्याचा अभ्यास केला जातोय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसंच, या कायद्याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनातही चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.