मुंबई - विधिमंडळ सार्वभौम सभागृह आहे. येथे सर्व धर्म समभावाची अपेक्षा असताना सरकारने विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या सोमवारी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शिवानी बहन यांचे दिव्य संदेशात्मक प्रवचन आयोजित केले आहे.

विधानमंडळाच्या सभागृहात पहिल्यांदाच आमदारांसाठी अध्यात्मिक गुरुचे प्रवचन होत आहे. यामुळे सरकारने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे. आज शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून तसे निमंत्रण जाहीर करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या सरकारने असे आयोजन करणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.