ETV Bharat / state

Mumbai Meri Jaan : मुंबई मेरी जान; गॉथिक शिल्पकलेचा नमुना मुंबई महापालिका मुख्यालय - मुंबई महापालिका मुख्यालय

मुंबई महापालिकेचे कामकाज त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या मुख्यालयातून केले जाते. ( CST BMC ) मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत १२९ वर्षं जूनी आहे. ब्रिटीशकालीन गॉथिक शिल्पकलेचे बांधकाम असलेली ही इमारत ( Gothic Sculpture in BMC ) पर्यटकांना गेल्या वर्षापासून हेरिटेज वॉकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Gothic Sculpture in BMC Mumbai Meri Jaan ET Bharat Series
Mumbai Meri Jaan : मुंबई मेरी जान; गॉथिक शिल्पकलेचा नमुना मुंबई महापालिका मुख्यालय
author img

By

Published : Feb 12, 2022, 5:30 AM IST

Updated : Feb 12, 2022, 1:03 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. ( Mumbai as International City ) या मुंबई शहरामधील नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ( BMC ) केले जाते. महापालिकेचे कामकाज त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या मुख्यालयातून केले जाते. ( CST BMC ) मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत १२९ वर्षं जूनी आहे. ब्रिटीशकालीन गॉथिक शिल्पकलेचे बांधकाम असलेली ही इमारत ( Gothic Sculpture in BMC ) पर्यटकांना गेल्या वर्षापासून हेरिटेज वॉकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मुंबईकर नागरिक व परदेशी पर्यटकांनाही इमारतीच्या आतील शिल्पकला पाहणे शक्य झाले आहे.

Gothic Sculpture in BMC Mumbai Meri Jaan ET Bharat Series
गॉथिक शिल्पकलेचा नमुना मुंबई महापालिका मुख्यालय

असे उभे राहिले महापालिका मुख्यालय -

मुंबई सात बेटांपासून बनलेले शहर आहे. मुंबईला सोयी सुविधा देण्याचे काम करण्यासाठी, विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे कायदे बनविणारे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांनी त्यावेळी इमारतीची कोनशिला बसवली. फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तु शिल्पकाराकडून मुख्यालय इमारतीचे संकल्पना चित्र व आराखडे तयार केले. तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या ६६००.६५ चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या बांधकामाला २५ एप्रिल १८८९ रोजी प्रारंभ झाला. यानंतर ३१ जुलै १८९३ रोजी बांधकाम पूर्ण झाले. रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली ठेकेदार व्यंकू बाळाजी कालेवार यांनी अपेक्षित कालावधीत काम पूर्ण केले.

त्यावेळी इमारत बांधकामाचा खर्च रुपये ११ लाख १९ हजार ९६९ इतका झाला. मूळ अंदाजित खर्च रुपये ११ लाख ८८ हजार ०९२ रुपयांच्या तुलनेत ६८ हजार ११३ रुपये इतका कमी खर्च झाला. बांधकाम पूर्ण करुन शिल्लक रक्कम सरकारजमा करण्यात आली. या इमारतीमध्ये १६ जानेवारी १८९३ पासून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ झाला आहे. या वास्तूचा हेरिटेज श्रेणी दोन-ए मधून हेरिटेज श्रेणी एकमध्ये समावेश करण्यात आला आहे. बांधकाम सुरू झाले तेव्हा ग्रॅटन गॅरी हे पालिकेचे अध्यक्ष तर तत्कालीन आयसीएस अधिकारी एडवर्ड चार्लस केयन ऑलिव्हंट हे पालिकेचे आयुक्त होते. बांधकाम पूर्ण झाले तेव्हा १८९३मध्ये थॉमस ब्लॅनी हे पालिका अध्यक्ष तर ए. अॅक्वर्थ हे पालिकेचे आयुक्त होते.

काय पाहता येते मुख्यालयात -

तत्कालीन गर्व्हनर विल्यम हॉर्नबी आणि बॉम्बे इंजिनीअर्सचे कर्नल जे. डी. क्रुकशांक यांच्या स्मरणार्थ नावे दिलेल्या रस्त्याच्या त्रिकोणी जागेत ही इमारत उभारण्यात आली आहे. मुख्यालयाची मूळ हेरिटेज इमारत दोन मजल्यांची असून, सुमारे २३५ फूट उंचीचा मनोरा आहे. इमारतीचे बहुतेक बांधकाम दगडी असून, इमारतीतील नक्षीकाम व कलाकुसर पाहण्यासारखी आहे. सजावटीसाठी नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी काचांचा वापर केलेला आहे. इमारतीत ठिकठिकाणी सिंह, वास्तुदेवतांची शिल्पे आहेत. मुख्यालयात सुमारे ६८ फूट लांब, ३२ फूट रुंद, ३८ फूट उंचीचे ऐतिहासिक सभागृह आकर्षणाचा भाग आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ सोनेरी घुमट लासखा वेधून घेणारा घुमट आहे. पहिल्या माळ्यावर सभागृह असून त्यात २३२ नगरसेवक बसण्याची व्यवस्था आहे. सभागृहात दोन प्रेक्षक दालनांचा समावेश सून तीन मोठी झुंबर आहेत. एखाद्या राजवाड्याची आठवण करून देणारे छत व सभागृहाची सजावट आहे. सभागृहात मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य करणाऱ्या महापुरुषांचे पुतळे तसेच तैलचित्र आहेत.

या इमारतीत महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, विविध पक्षांची प्रशस्थ कार्यालये आहेत. आधुनिकतेचा साज म्हणून इमारतीत लिफ्ट आणि वातानुकूलित यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र, वास्तूच्या कोणत्याही रचनेत बदल न करता ही वास्तू जपण्यात आली आहे. मुंबई महानगराच्या विकासाला दिशा देणारे फिरोजशहा मेहता यांचा पुतळा २३ एप्रिल १९२३ रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना आणि पर्यटकांना इमारतीसमोर छायाचित्र सेल्फी काढता यावी म्हणून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.

पालिकेच्या मुख्यालयात हॅरिटेज वॉक -

मुंबई महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र पर्यटन मंडळ आणि मुंबई महापालिकेच्या पुढाकारातून पालिकेच्या मुख्यालयात हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. सव्वाशे वर्षांहून जुन्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या वास्तूचे महत्त्व लोकांना माहिती असावे, यादृष्टीने हेरिटेज वॉकची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हाचा इतिहास बघण्यासारखा, शिकण्यासारखा आहे. मुंबईची जडणघडण कशी झाली, याचा इतिहास जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी हॅरिटेज वॉक सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या प्रसारामुळे हॅरिटेज वॉक बंद करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 12, 2022, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.