मुंबई - मुंबईमधील ऑईल कंपन्या आणि बंदराचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी कोल डेपो येथील एका गोडाऊनला आग लागली आहे. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
मुंबईतील शिवडी कोल येथील लक्ष्मी विलास हॉटेलजवळ असलेल्या एका गोडाऊनला आज (सोमवार) आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल 2 ची असून त्यात अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मुंबईत काही दिवसांआधी रोजच आग लागल्याच्या घटनांचे सत्र सुरू होते. त्यात कोरोना विषाणूचे सावट आल्यावर मुंबईतील आगीचे सत्र थांबले होते. तर, कालच मुंबईत कोणताही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नसल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्यानंतर आज पुन्हा आगीची घटना समोर आली आहे.
हेही वाचा - Coronavirus : पोल्ट्री व्यवसायाला सहाय्य करा, व्यवसायिकांची सरकारकडे मागणी