ETV Bharat / state

कांद्यासह लसणाच्या भावात तेजी; अतिवृष्टीमुळे उत्पादन प्रभावित - कांदा मुंबई बाजारभाव

बाजारात लसूण आणि कांदा पिकाची आवक कमी होत आहे. त्यामुळे लसून आणि कांद्याच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि कमी लागवडीमुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन कमी असल्यामुळे भारत इतर देशांकडून ही पिके आयात करणार असल्याचेही वृत्त आहे.

कांदा आणि लसणाच्या भावात तेजी
author img

By

Published : Sep 14, 2019, 5:06 PM IST

मुंबई - बाजारात लसूण आणि कांदा पिकाची आवक कमी होत आहे. त्यामुळे लसून आणि कांद्याच्या भावात तेजी पहायला मिळत आहे. साध्या लसणाचा भाव १०० ते २०० रुपये तर, किरकोळ बाजारात २०० ते ३०० रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. तसेच, कांद्याचे भाव ५० ते १०० रुपयांपर्यंत आहेत. अतिवृष्टी आणि कमी लागवडीमुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

कांदा आणि लसणाच्या भावात तेजी

यावर्षी सुरवातीला लसूण व कांद्याचे दर मागील दोन वर्षांच्या तुलनेने आवाक्यात होत. मात्र, एप्रिलमध्ये व मे मध्ये लागवड कमी झाली. तसेच, पावसाचा तडखा बसल्याने पिकाची नासाडीदेखील झाली. त्यामुळेच भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसुण ८० रुपये किलो तर, कांदा ४० रुपये किलो होता. जुलै महिन्यापासून लसणाच्या दरात आणि ऑगस्टपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात सरसकट येणार ऊस पिकावर बंदी?

दिवाळीपर्यंत कांदा-लसणाचे भाव असेच गगनाला भिडणार असल्याची माहिती व्यापारी सुरेश कोंढाळकर यांनी दिली आहे. उत्पादन कमी असल्यामुळे भारत इतर देशांकडून ही पिके आयात करणार असल्याचेही वृत्त आहे.

Intro:कांदा व लसुणचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले, दिवाळी पर्यंत भाव रडवणार

पावसामुळे व कमी लागवडीमुळे लसूण व कांदा उत्पादनावर परिणाम झाला असून मुंबईत बाजारामध्ये यांची आवक कमी होत आहे.त्यामुळे लसून व कांदा मोठ्या प्रमाणावर महागला आहे.साध्याच लसूण १०० ते २०० रुपये तर किरकोळ बाजारात २०० ते ३०० रुपये वर पोहोचलेला आहे.तसेच कांद्याचे भाव ५० रुपये पासून सुरू होऊन १०० रुपयांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत .पावसामुळे हे पिकं शेतात खराब झाल्यामुळे व कमी लागवडीमुळे या पिकांची बाजारात कमी आहे.

सुरुवातीला लसुनचे व कांद्याचे दर मागील दोन वर्षाच्या तुलनेत आवाक्यात होते, मात्र एप्रिलमध्ये व मे मध्ये लागवड कमी झाली .तसेच पावसाचा मोठा तडका या उत्पादनाला झाला त्यामुले या पिकाची नासाडी झाली. त्यामुळे भाव वाढले आहेत असे व्यापारी सांगत आहेत. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसुन ८० रुपये किलो होता व कांदा ४० रुपये किलो होता. जुलै महिन्यापासून लसूण दरात व ऑगस्ट पासून कांद्याचा दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे सध्या होलसेल बाजारात लसूण व कांदा प्रतिकिलो दर १०० ते २०० तर कांदा ४० ते ५० रुपये किलो आहे.
किरकोळ बाजारात प्रत्येक भागानुसार वेगवेगळे लसूण व कांद्याचे भाव नागरिकांना कपाळाला हात मारण्यासारखे आहेत .

पुढे अजून मोठ्या प्रमाणात कांदा व लसूण यांचे भाव मोठ्या प्रमाणात गगनाला भिडणार आहेत.त्यामुले कांदा व लसूण दिवाळी पर्यंत ग्राहकांना रडवणार असल्याचे चित्र आहे अशी माहिती व्यापारी सुरेश कोंढाळकर यांनी दिली आहे.

कांदा व लसूण हे पिकं कमी असल्यामुळे भारत इतर देशांकडून हे पिकं आयात करणार असल्याची बातमी आहे .त्यामुळे तसं न करता, शेतकऱ्यांना कधीतरी कमी उत्पादन असल्यामुळे चांगला भाव मिळत आहे त्यामुळे हे पिकं आयात करू नये असे व्यापाऱ्यांनी मत स्पष्ट केले.परन्तु जर हे पिकं आयात केले नाहीच, तर या पिकाचा तुटवडा निर्माण होईल व राज्यात कमी असलेल्या पिकाचे भाव गगनाला भिडतील त्यामुळे नागरिकांच्या हे पिकं विकत घेताना डोळयातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.