मुंबई - गोरेगाव आरे येथील तब्बल 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांनी फेटाळला. मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रो कार शेडसाठी ही झाडे अडथळा बनत आहेत. हा झाडे कापण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता.
मुंबई मेट्रोसाठी 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळला
मुंबईमध्ये सुरु होणाऱ्या मेट्रो कार शेडसाठी अडथळा बनत असलेली गोरेगाव आरे येथील 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने नाकारला आहे. हा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता.
मुंबई मेट्रोसाठी 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळला
मुंबई - गोरेगाव आरे येथील तब्बल 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांनी फेटाळला. मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रो कार शेडसाठी ही झाडे अडथळा बनत आहेत. हा झाडे कापण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता.
Intro:मुंबई - गोरेगांव आरे येथील तब्बल 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्यांनी आज फेटाळला. मुंबईत सुरु होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी ही झाडे अडथळा बनत असल्याने ती कापण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. झाडे तोडण्याला शिवसेनेचा विरोध असून त्याठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यामुळे आज हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
Body:गोरेगांव आरेमधील मेट्रोच्या कार डेपोसाठी 2238 झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे.ही झाडे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरत आहेत. ही झाडे कापण्यास शिवसेनेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव गेली दोन वर्ष रखडला आहे.दोन वर्षांनंतर हा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी वृक्षप्राधिकरण समितीपुढे आला होता.या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्याआगोदर जागेची पाहणी करणे आवश्यक असल्याने आठवड्याभरात आरे परिसराची वृक्ष प्राधिकरण समिती पाहणी करणार असल्याचे शिवसेनेचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे 27 आदिवासी पाडे विस्थापित होण्याचा धोका आहे. त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आम्ही कारशेडसाठी इतर जागा सुचवल्या असताना आरेमधील याच जागेचा हट्ट का असा प्रश्न यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.
अंधेरी पूर्व येथील आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे 3 प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी 2238 झाडे कापण्यास आणि 464 झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच 989 झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 21 जुलै 2017 रोजी प्रथम वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता.परंतु, यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही झाडे कापण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला नव्हता.मात्र, न्यायालयाने यासंदर्भात पर्यावरण प्रेमी तसेच वृक्षप्रेमींचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार 10 ऑक्टोबर 2018 रोजी लोकांकडून हरकती आणि सूचना जाणून घेण्यात आल्या.या हरकती आणि सूचनांचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयात सादर केला होता. तत्पूर्वी 21 सप्टेंबर 2018 रोजी या खात्यातील अधिकार्यांनी याची पाहणी केली होती. 4 जुलै 2019 रोजी वृक्षप्राधिकरण सदस्यांनी याची पाहणी केली. त्यानुसार हा प्रस्ताव पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
स्थायी समिती यशवंत जाधव यांचा बाईट Conclusion:null