मुंबई - मालाडच्या मालवणी परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या प्रियकर आणि त्यांच्या पाच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली -
या मुलीने वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी तिच्या प्रियकराला बोलवले होते. यावेळेस प्रियकरासोबत त्याचे पाच मित्रदेखील आले होते. याचाच फायदा घेत या प्रियकराने आणि त्याच्या 5 मित्रांनी मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 6 आरोपींना पोलिसांनी गजा आड केले आहे. प्रकरणात अन्य कोणी आरोपी आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी सर्व आरोपींना दिंडोशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट आहे. आरोपीला कठोर शासन करावे, अशी मागणी समाजामधून होत आहेत. विशेष म्हणजे पीडित तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांशी ओळख झाली होती.
हेही वाचा - नागपूर निर्बंधांसह 'अनलॉक' : जाणून घ्या काय आहेत निर्बंध...