वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली
Ganesh Visarjan Live - गणेश विसर्जनादरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये दोन, वर्सोव्यात 5 मुले बुडाली - undefined
00:10 September 20
22:42 September 19
पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जन करत असताना दोन जण बुडाले; एकाचा मृतदेह आढळला
20:50 September 19
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कृत्रिम हौदात 'श्रीं'चे विसर्जन
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
16:24 September 19
मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत २१८५ गणेश मूर्तींचे विसर्जन
मुंबई - मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत २१८५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ८५ सार्वजनिक, २०६९ घरगुती आणि ३१ गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण २१८५ मूर्त्यांपैकी ८९६ मूर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक २९, घरगुती ८५७ तर १० गौरींचा समावेश होता. आज रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू राहणार आहे. विसर्जनादारम्यान भाविकांना समुद्र किंवा तलावात जाण्यास बंदी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नासल्याची पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची माहिती.
16:00 September 19
पुण्यातील मानाच्या पाचही बाप्पांचं विसर्जन
15:56 September 19
पोलिस, शीघ्रकृती दलाच्या बंदोबस्तात लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक
मुंबई - अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या लालबाग राजाचे गणेश चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होत आहे. कोरोनाचे संकट आणि दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे पोलीस आणि शीघ्रकृतीच्या बंदोबस्तात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश भक्तांनी मिरवणुकीसाठी मोठी गर्दी करू नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूला बेरिकेट्स लावून रस्ते बंदिस्त केले होते. घरांच्या खिडक्या, टेरेसवर, उड्डाण पुलावरून भाविकांनी फुलांचा वर्षाव आणि जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
15:54 September 19
नागपूरच्या राजाला साध्या पद्धतीने निरोप
नागपूर - दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरचा राजा म्हणून ओळख असलेल्या तुळशीबागेतील गणरायाला निरोप देण्यात आला. मागील 25 वर्षांपासून नागपुराच्या राजाचा थाटात उत्सव साजरा केला जात असतांना कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. यामुळे ऐरवी घोडे, बँड, भव्य मिरवणूककींचा जो थाट आहे तो यंदा दिसून आलेला नाही. यंदाही मूर्तीची भव्यता आणि थाट मात्र कमी असला तर भक्तिमय वातवरणात बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. कोराडी येथे बाप्पाचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
13:25 September 19
विसर्जनात गर्दी करू नक, मुंबई महापौरांचं आवाहन
'मुंबईच्या सर्व नागरिकांना आवाहन आहे, की गणेश विसर्जनाच्या निमित्ताने कोणीही गर्दी करू नये. कोविड नियमांच सगळ्यांनी पालन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुद्धा आमचं आवाहन आहे की विसर्जनाच्या वेळेस गर्दी करू नये. आम्ही सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांसोबत बोललो देखील आहे. निर्विघ्नपणे हा विसर्जन सोहळा पार पडावा हीच श्रींच्या चरणी प्रार्थना,' असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले
13:24 September 19
मुंबई गणपती विसर्जन-
मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत ४६६ गणेश मूर्तींचे विसर्जन
४६६ पैकी १७४ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन
विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना नाही
12:55 September 19
पुणे -
तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात पोलिसांनी ढोल-ताशा पथकाला रोखलं,
ढोल-ताशांना मनाई असतानाही वादन
पुणे पोलिसांकडून ढोल-ताशे जप्त
12:10 September 19
मुंबई -
लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
11:51 September 19
मुंबई -
लालबागच्या मुख्य गेटसमोर आरएएफ दलाची फौज तैनात
11:34 September 19
पुणे -
मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात
11:11 September 19
मुंबई - लालबागच्या राजाला 2 तासात विसर्जन करण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना
लालबागच्या राजाला 2 तासात विसर्जन करण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना,
केवळ 10 कार्यकर्त्यांनाच विसर्जन मिरवणुकीत सामिल होता येणाार,
लालबागचा राजा थोड्याच वेळात विसर्जनासाठी मंडपातून रवाना होणार.
11:10 September 19
औरंगाबाद -
संस्थान गणपतीची आरती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे उपस्थित होते.
11:07 September 19
मिरवणुकीत गर्दी, गणेश गल्ली मुंबईच्या राजाची मिरवणूक पोलिसांनी आडवली
गणेश गल्ली मुंबईच्या राजाची मिरवणूक पोलिसांनी आडवली,
नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी लावले बॅरिकेट
भाविक आणि कार्यकर्त्यांची गर्दी आटोक्यात आणून मिरवणूक पुन्हा मार्गस्थ
मोजक्या 10 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबईचा राजा विसर्जन स्थळाकडे रवाना
10:35 September 19
कोल्हापूर -
एका रात्रीत कोल्हापुरात अवतरली 21 फुटी गणेशमूर्ती
निर्बंध असताना महागणपती समजला जाणारा शिवाजी चौकाचा गणपती एका रात्रीत मंडपात दाखल
विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त
गणेश आगमना दिवशी याच मंडळवर झाला होता गुन्हा दाखल
10:31 September 19
पुणे
मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाच्या विसर्जनाला थोड्याच वेळात होणार सुरवात,
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार विसर्जन
09:36 September 19
गणेश गल्ली मुंबईचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
गणेश गल्लीचा (मुंबईचा राजा) गणपती आज सकाळी 10.30 वाजता मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ,
दरवर्षी प्रमाणे 10 ते 12 तासाची मिरवणूक नसणार,
दुपारी 1 वाजेपर्यंत विसर्जन केले जाणार,
09:36 September 19
- लालबागचा राजा दुपारी 12 वाजता मंडपातून विसर्जन स्थळाकडे रवाना होणार,
- दरवर्षी प्रमाणे 18 ते 20 तासाची मिरवणूक नसणार,
- मागील वर्षी कोरोनाच्या प्रसारामुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली नव्हती.
09:06 September 19
कोल्हापूर -
कोल्हापुरातील पहिल्या मनाच्या गणपतीचे थोड्याच वेळात होणार विसर्जन
09:02 September 19
मुंबई -
बाप्पाला निरोप देताना त्याच्याकडे एकच साकडे मागुया. पुढच्या वर्षी लवकर या आणि येताना कोरोनामुक्त आयुष्य घेऊन या!, CP Mumbai Police यांचे ट्विट
09:00 September 19
पुणे -
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज सायंकाळी 6.36 मिनिटांनी होणार विसर्जन
08:38 September 19
चंद्रकांत पाटील पुण्यातील मोठ्या गणपतीला देणार भेट
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आज अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यातील विविध गणेश मंडळांना सकाळी भेट देणार आहेत. सकाळी 8:30 वाजता पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती येथे त्यांनी पूजन केले. यानंतर ते साईनाथ मित्र मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ, तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळ आणि शेवटी केसरीवाडा येथे भेट देणार आहेत.
08:26 September 19
नाशिकमध्ये अडिच हजार पोलीस तैनात
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सर्वत्र सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जन मिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आली आ. त्यामुळे शांततेत व नियमांचे पालन करून गणपती विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुमारे अडिच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये तैनात राहणार आहे.
06:34 September 19
पुण्यात सर्वच मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातील हौदात होणार
पुण्यात आज गणेश विसर्जनाच्या दिवशी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मानाच्या गणपतीचे सकाळी 10 वाजल्यापासून मंडपातच विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी बंदी आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील व्यापारी बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे. रविवारी सकाळी दहा वाजता मानाच्या पहिल्या गणपतींचे विसर्जन सुरुवात होईल व रात्री सातपर्यंत सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन होईल. सर्वच मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातील हौदात होणार आहे.
06:04 September 19
Ganesh Visarjan Live : मुंबईत गणपती विसर्जन ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त
मुंबई : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. संवेदनशील ठिकाणी आणि भागात गस्त घालण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.