ETV Bharat / state

गणपती बाप्पाला आज निरोप! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त - गणेशोत्सव २०२० वर कोरोनाचा परिणाम

आज दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महापालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत.

ganesh festival 2020  ten days ganesh emersion  corona effect on ganesh festival  गणेशोत्सव २०२०  गणेशोत्सव २०२० वर कोरोनाचा परिणाम  दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन
आज दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप, मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त
author img

By

Published : Sep 1, 2020, 8:25 AM IST

Updated : Sep 1, 2020, 12:21 PM IST

मुंबई - गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता होत आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी ४४५ स्थळं निश्चित करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गणपती बाप्पाला आज निरोप! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

मुंबई शहरात वाहतूक विभाग, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक , आर ए एफ , बीबीडीएस, होमगार्ड यांच्यासह स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. याबरोबरच, मुंबई शहरात असलेल्या 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत सुद्धा घेतली जाणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू तसेच तटरक्षक दलाच्या मदतीने बोटी लॉंचेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

नागरिकांनी गणपती विसर्जनाला येण्याअगोदर आरती व पूजा ही विसर्जनस्थळी न करता घरीच करावी, गणेश विसर्जन करिता महापालिकेने 167 कृत्रिम विसर्जन स्थळ निर्माण केली आहेत. त्याचा वापर करावा, याबरोबरच रस्त्यावर गर्दी न करता नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विनाकारण न जाण्याचा आग्रह मुंबई पोलिसांनी केला आहे.

गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या गाईडलाइन्स -

• घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

• मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. १ ते २ मीटर अंतरातील गणेश भक्तांनी मूर्ती नैसर्गिक विसर्जन स्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यायच्या आहेत. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ आणि मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करण्यात आली आहे.

• नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १६८ कृत्रिम तलाव निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने या कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.

महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्‍त्‍यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तींचे विसर्जन मंडपातच करायचे आहे; किंवा विसर्जनाची तारीख पुढे ढकलावी लागणार आहे. सील केलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तींची व्‍यवस्‍था घरीच करायची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

मूर्ती संकलन केंद्रांवर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करून घेणे बंधनकारक आहे.

महापालिकेने विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करून फिरत्या विसर्जन स्‍थळांची सोय केली आहे.

२०२० गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

विसर्जनादरम्‍यान सोशल डिस्टन्सचे देखील पालन करणे आवश्यक असल्याचे पालिकेने सांगितले. मास्‍क, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात आले आहे.

Last Updated : Sep 1, 2020, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.