मुंबई - कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. काल गुरुवारी मोठ्या भक्तीभावाने गौरी आणि गणपती बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. नैसर्गिक व कृत्रिम अशा विसर्जन स्थळांवर गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत 36,091 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 19,077 मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. मुंबईत या वर्षी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले आहे.
शनिवारी २२ ऑगस्टला सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचे आदरतिथ्य केल्यावर गुरूवारी जड अंतःकरणाने भाविकांनी गौरी आणि गणपती बाप्पाला निरोप दिला. रात्री 12 वाजेपर्यंत 36,091 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात 546 सार्वजनिक, 31,685 घरगुती तर 3,860 गौरी मूर्त्यांचा समावेश आहे. एकूण 36,091 पैकी 19,077 मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद -
मुंबईत गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत गौरी आणि गणपतीच्या 36,091 मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात 19,077 मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात 355 सार्वजनिक, 16,687 घरगुती तर 2,035 गौरीच्या अशा एकूण 19,077 मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत या वर्षी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले आहे.