मुंबई - शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. पुढील 4 दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; अनेक ठिकाणी वाहतूक बंद
live updates -
- 11.56 PM - रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरू
- 07.52 PM - ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सुरू आहे.
- 07.52 PM - वसई आणि विरार दरम्यान सेवा पूर्णपणे बंद
- 07.52 PM - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, गोरेगाव, अंधेरी सेवा बंद, तर तर वाशी पनवेल सेवा सुरू
- 07.52 PM - ठाणे ते कर्जत, कसारा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर रेल्वे सुरू आहेत.
- 07.52 PM - मध्ये रेल्वेची ठाणे आणि सीएसएमटी सेवा ठप्प
- 06.58 PM - विरार ते वसई दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्यामूळे लोकल सेवा बंद
- 04.06 PM- मुंबई पूर्व उपनगरात पावसाने घेतली विश्रांती
- 02.30 PM - महापालिका प्रशासन, अग्नीशमन दल, एनडीआरएफ आणि नेव्हीची पथके मिठी नदी परिसरात बोटीने गस्त घालत आहेत.
- 12.49 PM - एनडीआरएफच्या मदतीने १३०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
- 12.16 PM - मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. एनडीआरएफचे एक पथक कुर्ला येथीस बैल बाजाराकडे रवाना करण्यात आले.
- 12.00 PM - मुंबईत २४९ मिलीमीटर पावसाची नोंद
पावसामुळे सायन, माटूंगा, दादर या परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा फटका रस्ते व रेल्वे वाहतूकीला देखील बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे, हॉर्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस 4 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा- ठाण्यात पावसाचे थैमान; रेल्वेसह जनजीवन विस्कळीत
मुंबईमध्ये पावसाचा जोर आजही कायम आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. गणेशोत्सव सुरू असताना शाळांना 5 दिवासाची सुट्टी असते. त्यातही काही शाळा सुरू असतात. मात्र, त्या शाळांना देखील सुट्टी देण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहे.
सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान एका तासात झालेली पावसाची नोंद -
- भांडूप कॉम्प्लेक्स - 14 मिमी
- बिल्डिंग प्रपोजल ऑफिस - 13 मिमी
- चेंबूर एम वेस्ट वॉर्ड ऑफिस - 11.44 मिमी
- दहिसर फायर स्टेशन - 12 मिमी
- अंधेरी वेस्ट कार्यालय - 11 मिमी
मंगळवारी रात्रीपासूनच पाऊस असल्याने माटुंगा गांधी मार्केट येथे पाणी भरले होते. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक वळवण्यात आली होती. वाहतूक सकाळी 6 वाजून 45 मिनिटांपासून पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, कांदिवली, कुर्ला एलबीएस रोड आणि हिंदमाता येथे पाणी साचले आहे.