ETV Bharat / state

Nagpada Murder Case : नागपाड्यात मित्रानेच मित्राचा केला गेम, गाणे ऐकण्याच्या वादातून हत्या - नागपाडा पोलिसांनी एकास केली अटक

मोबाईल वरुन झालेल्या वादातून मित्राने आपल्या मित्राची हत्या ( Nagpada Friend Murder Friend ) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्यास आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

Nagpada Murder Case
नागपाड्यात मित्रानेच मित्राचा केला गेम, गाणे ऐकण्याच्या वादातून हत्या
author img

By

Published : Jan 10, 2022, 2:11 PM IST

मुंबई - मोबाईलवर गाणे ऐकण्याची सवय एका युवकाच्या जीवावर बेतली आहे. नागपाडा येथे मोबाईल वरुन झालेल्या वादातून एका तरुणाने मित्राची हत्या केल्याची ( Nagpada Friend Murder Friend ) घटना समोर आली आहे. रविवारी ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या ( Nagpada Police One Arrested ) आवळल्या आहेत.

सन्मान सुधीर सावंत असं हत्या झालेल्या 23 वर्षीय युवकाच नाव आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीपकुमार हरिकिशन राम ( वय 24 ) याला ( Nagpada Police Arrested Dilipkumar ) ताब्यात घेतले आहे. दोघेही एकमेकांचे मित्र असून, एकाच परिसरात राहतात. आरोपी दिलीप कुमारला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोघे एकत्र फिरत असताना दिलीपकुमारचा मोबाईल सन्मानने परत दिला नाही. त्यावरुन गुडलक इंजनिअरिंग वर्क्स स्कूलच्या समोर दोघांत भांडण झाले. त्यावेळी दिलीपकुमारने सन्मानला जोरदार धक्का दिल्याने तो गाड्यांमध्ये जाऊन पडला. तेव्हा सन्मानच्या डोक्याला जोरदार मार लागला. हे पाहून दिलीपकुमारने तेथून पळ काढला. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ( Nagpada Police Case Filed ) असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा - Parambir Singh case : परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ ; सीआयडी आज नोंदवणार अनुप डांगे यांचा जबाब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.