ETV Bharat / state

Naxalite Killed in Gadchiroli : जखमी झालेल्या चौघांवर नागपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

author img

By

Published : Nov 13, 2021, 9:47 PM IST

Updated : Nov 13, 2021, 10:50 PM IST

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात काही नक्षलवादी हालचाल सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारच्या रात्रीपासूनच पोलिसांनी नक्षलविरोधी सर्च अभियान राबवीत असतांना त्या जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला.

four injured in naxalite attack are undergoing treatment at private hospital in Nagpur
जखमी झालेल्या चौघांवर नागपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

नागपूर - गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात शनिवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा झाला. तर चार पोलीस कर्मचारी जखमी (four injured in naxalite attack) झाले आहेत. त्यांना नागपूर शहरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

ऑरेंज हॉस्पिटलमधील डॉक्टर याबाबत माहिती देताना

एकाच वेळी २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकी दरम्यान चार पोलीस जवान जखमी झाल्याने त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. जखमींमध्ये रवींद्र नैताम, सर्ववेश्वर आत्राम, महारु कुलमेथे, टिकाराम कटांगे यांचा समावेश आहे. या चौघांवर ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये (four injured in naxalite attack admitted in orange city hospital) उपचार सुरू झाले आहेत. मात्र, यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली.

पोलीस-नक्षल चकमकीचा घटनाक्रम -

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात काही नक्षलवादी हालचाल सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारच्या रात्रीपासूनच पोलिसांनी नक्षलविरोधी सर्च अभियान राबवीत असतांना त्या जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला. नक्षल्यांना जशाच तसे प्रतिउत्तर पोलिसांनी दिले. या चाललेल्या दिवसभराच्या चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. तसेच २६ मृतदेह हस्तगत केले असून पुन्हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलीस विभागाने नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून अधिक जवानाचा फौजफाटा घटनेस्थळी दाखल झाला आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नसली तरीही यामध्ये नक्षल दलमचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - Gadchiroli Naxal Encounters : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकींचा आढावा

Last Updated : Nov 13, 2021, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.