मुंबई : एक महिला जी सेक्सवर्कर म्हणून आपला व्यवसाय करत होती. सुमारे पाच वर्षांपूर्वीची ही घटना आहे. 2016 मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पहाटेच्या सुमारामध्ये सकाळी दीड ते दोनच्या कालावधीत एक माणूस रिक्षातून खाली उतरला. तो या महिलेच्या दिशेने आला. त्या महिलेवर त्याने बळजबरी करून तिला रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा या महिलेला त्याने आतमध्ये जबरदस्तीने बसायला सांगितले तेव्हा आतमध्ये आधीच इतर त्याचे सहकारी व्यक्ती रिक्षामध्ये होते. त्यांनी तिचे तोंड बंद केले आणि तिला रिक्षामध्ये बसवले व मारण्याची धमकी दिली गेली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व अनैसर्गिक शरीर संबंध केले. अशा प्रकारचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता.
तिच्या बाजूने सुमारे दहा साक्षीदार : ही घटना तिच्यासोबत घडल्यानंतर तिच्या म्हणण्यानुसार त्या भागातील परिसरातील लोक गोळा झाले. कारण तिने जनतेला ओरडून ओरडून याबाबत सांगितले, की चार-पाच लोक आले आणि त्यांनी जबरदस्ती केली. त्यानंतर तिच्या म्हणण्यानुसार प्रथम माहिती अहवाल संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केला गेला. तिच्या बाजूने सुमारे दहा साक्षीदार देखील त्यावेळी होते. ही तिची बाजू न्यायालयामध्ये तिच्या वकिलांनी मांडली.
पैसे न देण्याबाबत शाब्दिक वाद : याबाबत त्या चारही आरोपींच्या संदर्भात बाजू मांडताना वकिलांनी मुंबई महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर युक्तिवाद केला की, ही महिला सेक्स वर्कर आहे. तिला ज्या व्यक्तींनी कामावर ठेवले होते. त्यांच्यासोबत पैसे न देण्याबाबत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हिने हा असा खोटा गुन्हा दाखल केला आणि याचे सबळ पुरावे म्हणजे जेव्हा तिला तपासणी ओळख करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेला पीडित महिलेने त्या संबंधित आरोपींना ओळखले सुद्धा नाही. त्यामुळेच तिचा आरोप निराधार आहे त्याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे समोर येत नाही.
बळजबरीने शरीर संबंध ठेवण्याचा अधिकीर नाही : न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या दाव्यांची पडताळणी केल्यानंतर अधोरेखित केले की, एक महिला ही शरीर संबंधाचा व्यवसाय जरी करत असली, तरी तिच्यासोबत कोणत्याही व्यक्तीने बळजबरीने शरीर संबंध ठेवण्याचा कोणालाही अधिकार प्राप्त होत नाही. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे, याची खात्री करण्याची गरज आहे. केवळ तिच्या म्हणण्यामुळे याची खातरजमा होत नाही. तर त्याबाबत सबळ पुरावे ती या प्रकरणात समोर आणू शकलेली नाही.
चारही आरोपींना निर्दोष मुक्त केले : न्यायालयाने हे देखील नमूद केले की, ही घटना झाली. या अनुषंगाने काही शारीरिक इजा होणे दुखापत होणे किंवा रक्तस्त्राव होणे, असा वैद्यकीय पुरावा देखील न्यायालयामध्ये सदर फिर्यादी महिलेकडून सादर केला गेला नाही. तसेच बळाचा वापर केला गेला याबाबतचा देखील कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. सबब कोणताही ठोस पुरावा फिर्यादीकडून आरोपींच्या बाबत मानला गेलेला नसल्यामुळे न्यायालयाने चारही आरोपींना निर्दोष मुक्त केले.
हेही वाचा : Pune Crime News : प्रेयसीच्या घरी जाऊन पतीला मारहाण करत पिस्तूल रोखले...पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल