ETV Bharat / state

'बाईसाहेब, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या! माजी पोलीस अधिकाऱ्याने माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना फटकारले' - former police officer advocate vishwas kashyap

माजी पोलीस अधिकारी अ‌ॅडव्होकेट विश्वास कश्यप यांनीही याबाबत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अमृता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणाले, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या. मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल, आपल्याला काय आणि किती माहिती आहे? त्याबाबत आपला काय अभ्यास आहे? मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल तुम्ही कुठे दोन-चार ओळी वाचल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले. पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही. मात्र, मुळात पोलिसांचा तपास कसा असतो ? काय असतो ? तो तपास कसा केला जातो ? याबाबत आपल्याला थोडेतरी कायदेशीर ज्ञान आहे का? आपण अ‌ॅक्सिस बँकेत काम करणाऱ्या एक कारकून महिला आहात. आमच्या दृष्टीने जरी कोणी क्लास वन, क्लास टू असला तरी तो कारकुंडाच बरं का. कारण क्लास कोणताही असो शेवटी काम कारकुनाचेच, असेही कश्यप म्हणाले.

former police officer advocate vishwas kashyap wrote letter to amruta fadnavis
अॅडव्होकेट विश्वास कश्यप यांचे अमृता फडणवीसांना पत्र (फोटो विश्वास कश्यप यांच्या फेसबुक वॉलवरुन)
author img

By

Published : Aug 9, 2020, 4:10 PM IST

Updated : Aug 9, 2020, 4:24 PM IST

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्याप्रकारे हाताळले जात आहे - मला वाटते, मुंबईने मानवता गमावली आहे आणि ती निर्देश, स्वाभिमानी नागरिकांना जगण्यासाठी सुरक्षित नाही.' अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर अनेक स्तरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी पोलीस अधिकारी अ‌ॅडव्होकेट विश्वास कश्यप यांनीही याबाबत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अमृता यांना पत्र लिहिले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या पत्रात ते म्हणाले, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या. मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल, आपल्याला काय आणि किती माहिती आहे? त्याबाबत आपला काय अभ्यास आहे? मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल तुम्ही कुठे दोन-चार ओळी वाचल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले. पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही. मात्र, मुळात पोलिसांचा तपास कसा असतो ? काय असतो ? तो तपास कसा केला जातो ? याबाबत आपल्याला थोडेतरी कायदेशीर ज्ञान आहे का? आपण एक्सेस बँकेत काम करणाऱ्या एक कारकून महिला आहात. आमच्या दृष्टीने जरी कोणी क्लास वन, क्लास टू असला तरी तो कारकुंडाच बरं का. कारण क्लास कोणताही असो शेवटी काम कारकुनाचेच, असेही कश्यप म्हणाले.

कश्यप पुढे म्हणाले, आपल्या पतीदेवाच्या कृपेने त्या मृत झालेल्या अ‌ॅक्सिस बँकेला संजीवनी देण्याचे मोठे देशकार्य आपण केलेत. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार अ‌ॅक्सिस बँकेत वळविलेत असे समजते. कोट्यवधी रुपयांचा तो व्यवहार होता. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तो आर्थिक घोटाळाच आहे, असे आपणास वाटत नाही का? त्यावेळी सरकारी कार्यालयातील युनियननेसुद्धा त्याबाबत काही जोरदार आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. नाहीतर सरकारी वेळेपेक्षा 12-13 मिनिटे जास्त काम करायला सांगितले तर संघर्ष करायला ही मंडळी फणा काढून उभी असतात, अशी टीकाही कश्यप यांनी केली.

कश्यप यांनी अमृता फडणवीस यांना लिहिलेले सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे,

'आपण मुख्यमंत्रीपत्नी झाल्या झाल्या अ‌ॅक्सिस बँकेने आपली बदली नागपूरहून डायरेक्ट मुंबईला केली. येथे सर्वसाधारण बाईला दादर पूर्व शाखेतून दादर पश्चिम शाखेत बदली करून घ्यायची असेल तर काय दिव्य करावे लागते हे त्या माउलीला विचारा कधीतरी? अ‌ॅक्सिस बँकेला तुम्ही दिलेल्या संजीवनी बुटीमुळे त्यांनी लगेचच आपल्याला मोठे पद बहाल केले. तेसुद्धा खालल्या मिठाला जागले हो. नाहीतर साध्या कर्मचाऱ्याने बँकेसाठी कितीही मोठा धंदा केला तरी त्याला कोणीही हिंग लावून विचारत नाही. तुम्हाला मात्र बँकेने मोठी बढती दिली. बढतीबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र, बढती ही स्वतःच्या हिमतीवर असावी. नाही का ?

सुशांतसिंह प्रकरणात तुम्ही लक्ष घालायला नको बाईसाहेब. ही फिल्मी मंडळी कशी आहेत हे आपल्याला माहीत नाही. ते आम्हा पोलिसांना विचारा. ही मंडळी एक नंबरची स्वार्थी आणि घाणेरडी असतात. नैतिकता वगैरे शब्द त्यांनी केव्हाच गुंडाळून त्यांच्या बेडखाली ठेवलेल्या असतात. तर अशा या फिल्म इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला इतकी का आपुलकी वाटावी? तुम्हाला त्यांच्या जंगी पार्ट्यांमध्ये गाण्याची संधी दिली म्हणून की काय? त्या अमिताभ बच्चनबरोबर जाहिरात करण्याची संधी मिळाली म्हणून की काय? अहो त्या अमिताभ बच्चनसारखा स्वार्थी माणूस संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोधून सापडणार नाही.

स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय तो कोणाकडे बघून हसत सुद्धा नाही. त्याने संपूर्ण लॉकडाऊनमध्ये कोणा गरीबाला पाच किलो तांदूळसुद्धा वाटले नाहीत हो. आपण फक्त मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून अमिताभने आपल्याबरोबर जाहिरात केली. मात्र, त्या सर्व घटनाक्रमात आपण स्वतः मात्र फारच मोठ्या सेलिब्रेटी असल्याचा समज करून घेतलात. कपूर खानदान, खान खानदान, खन्ना खानदान याबरोबरच फडणवीस खानदान बनविण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलात. परंतु, महाराष्ट्रात सत्तापालट झाली आणि आपले खानदान मोडीत निघाले. असो. बॅड लक.

मुद्दा असा आहे की, सुशांतसिंह प्रकरणात तुम्ही मुंबई पोलिसांना दोष दिला. मुंबई सुरक्षित नाही असे तुम्ही म्हणालात. बाईसाहेब तुम्ही सहा वर्षांपूर्वी नागपुराहून मुंबईत आलात आणि लगेचच मुंबई पोलिसांना सर्टिफिकेट दिलेत. वर्षानुवर्षे मुंबईत राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला विशेषतः परप्रांतीय स्त्रीला विचारा तिला मुंबईत सुरक्षित वाटते की तिच्या राज्यामध्ये? ती पोलिसांविषयी गैरसमजुतीतून दोन गोष्टी वाईट बोलेल पण ती जास्त सुरक्षित मुंबईमध्येच आहे हे विश्वासाने सांगेन.

बाईसाहेब, बँकेची आकडेमोड करता करता मुंबई पोलिसांच्या कामाचा ग्राफ आणि देशातील इतर राज्यातील पोलिसांचा ग्राफ याचा कधीतरी शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी अभ्यास करीत चला. मुंबई पोलीस इतक्या वाईट आणि अवघड परिस्थितीत त्यांचे कर्तव्य करीत असून सुद्धा जगात दोन नंबरचे नावाजलेले पोलीस दल आहे. नंबर दोन. आणि त्या मुंबई पोलिसांना तुम्ही नावे ठेवत आहात? कोणत्या अधिकाराने? फक्त माजी मुख्यमंत्री पत्नी आहात म्हणून?

कोरोना महोत्सवात आमचे शेकडो पोलीस बांधव शहीद झालेत. जीवावर उदार होऊन दिवसरात्र, उन्हातान्हात, पावसात रस्त्यावर उभे राहून ते जनतेसाठी कर्तव्य करीत आहेत आणि तुम्ही तुमच्या फिल्मी स्टाईलने पोलिसांना बदनाम करत आहात. तुमच्या 'फडणवीस' घराण्यातील कोणी आहे का पोलीस खात्यात? नाही ना? कोरोना महोत्सवात शहीद झालेल्या एकातरी कुटुंबाच्या घरी जाऊन तुम्ही त्यांची सांत्वनपर भेट घेतलीत का हो? त्यांची कुटुंबे कोणत्या अवस्थेत जगत आहेत, जगणार आहेत याचा कधीतरी आपण विचार केलात का?

आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून इतके दिवस तुमचा मानसन्मान ठेवला. परंतु ज्या पोलिसांच्या जीवावर तुम्ही दिवसरात्र जीवाची मुंबई करता आणि त्यांनाच नावे ठेवता. त्यावेळी तुमचा मानसन्मान की काय तो ठेवावा की नाही याचा विचार करावा लागतो.

बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या. मागेपुढे पोलीस तुमच्या संरक्षणाला आहेत. याचे भान ठेवा. फुकटच्या संरक्षणात फिरूनसुद्धा ही भाषा, बरी नव्हे असले वागणे.

बाईसाहेब, तुमच्या ह्यांनी म्हणजे देवेंद्रजीनी हो. पाच वर्षे मुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्रीपद सुद्धा उपभोगले. पोलीस खात्यासाठी काय केले हो त्यांनी? पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी काय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या हो त्यांनी? पाच वर्षे गृहमंत्री असताना पोलिसांसाठी त्यांनी केलेली कोणतीही पाच चांगली कामे सांगावीत.

बाईसाहेब, पाच वर्षे म्हणजे फार मोठा कालावधी असतो. मात्र, तुमच्या पतीदेवाने या पाच वर्षात गृहखात्यात फतकल मांडून बसल्याशिवाय काहीही केले नाही. ना त्यांनी पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविला, ना त्यांनी पोलिसांच्या विधवा महिलेचा प्रश्न सोडविला? ना पोलिसांच्या मुलांच्या भविष्यासंबंधी काही प्रश्न सोडविला. काहीही नाही. पती वारल्यानंतर सरकारी घर दोन ते तीन महिन्यात खाली करावे लागते. वाईट परिस्थितीत एखादी विधवा पोलीस महिला आपल्या पतीराजाकडे गेली आणि तिने घरात राहण्यासाठी ५/६ महिन्याची मुदतवाढ मागितली तर ती सुद्धा त्यांना देण्यात आली नाही. सरकारी नियमानुसार काम होईल असे भावनाशून्य उत्तर मिळत असे.

बड्या दोन-चार आयपीएस अधिकाऱ्यांबरोबर बसून गृहखात्याची पाच वर्षे या व्यक्तीने वाया घालविली. खालच्या, मधल्या श्रेणीतील पोलिसांना त्यांनी कधीच न्याय दिला नाही आणि आता तुम्ही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करीत आहात? आणि आमच्यासारख्या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी ते ऐकून गप्प बसावे अशी आपली अपेक्षा आहे की काय?

पोलिसांना शिस्तीच्या नावाखाली बोलता येत नाही. त्यांना युनियन करता येत नाही म्हणून ते बोलू शकत नाहीत. म्हणून कोणीही सोम्यागोम्या उठेल आणि पोलिसांविषयी काहीही बरळेल? हे सहन होणार नाही.

बाईसाहेब, तुम्हाला जर मुंबईत सुरक्षित वाटतच नसेल तर कशाला राहता मुंबईत? रहा ना तिकडे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये. तसेही आपल्या पतीदेवाने पाच वर्षे गुजरातसाठी, दोन गुजरात्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्रात राहून काम केले. अगदी तसेच तुम्ही बिहारमध्ये जाऊन त्या सुशांतसिंहच्या घराच्या बाजूला घर घेऊन रहा आणि बिहारचे कल्याण करा.

बाईसाहेब, एक नम्र विनंती, यापुढे एकही वाकडी तिकडी कॉमेंट पोलिसांविषयी टाकू नका. ज्या क्षेत्रातील आपल्याला काही कळत नाही त्यावर आपण कशाला बोलायचे? आपले सामाजिक योगदान किती? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ? जरा सांभाळून बाईसाहेब.'

धन्यवाद!

अ‌ॅडव्होकेट विश्वास कश्यप (माजी पोलीस अधिकारी, मुंबई)

Last Updated : Aug 9, 2020, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.