ETV Bharat / state

Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या 24 जानेवारी पर्यंत कारागृहातील मुक्काम वाढला - jail stay extended till January 24

माजी मंत्री नवाब मलिक (Former minister Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आज 14 दिवसाची (jail stay extended till January 24) वाढ करण्यात आली. 24 जानेवारी पर्यंत कारागृहातील मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र न्यायालयाच्या परवानगीने त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Former minister Nawab Malik
माजी मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Jan 6, 2023, 3:59 PM IST

मुंबई : नवाब मलिक (Former minister Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यापासून न्यायालयीन कोठडीत आहे. आज नवा मलिक यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाने पुन्हा 14 दिवसाची (jail stay extended till January 24) कोठडीत वाढ केली आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार असल्याने त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे त्यामुळे ते आज न्यायालयात हजर होऊ शकले नाही.

नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप? : नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (Prevention of Money Laundering) कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच 'ईडी'ने कारवाई करत मलिक यांना अटक केली होती. मलिक यांनी याआधीही अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा प्रत्येक अर्ज फेटाळण्यात आला आहे. मलिक सुरुवातीला आर्थर रोड कारागृहात होते. मात्र त्यांना मृतपिंडाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत.

हसीना पारकरच्या मुलाच्या जबाबामुळे अडकले नवाब मलिक : दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर हा मुंबईत राहतो. गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.