ETV Bharat / state

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 56 कोटी 4 लाख 83 हजार इतका निधी वितरित - विजय वडेट्टीवार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांना एकूण 56 कोटी 4 लाख 83 हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

author img

By

Published : Nov 2, 2021, 9:43 PM IST

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांना एकूण 56 कोटी 4 लाख 83 हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींची मानके व बाबी नुसार करावयाचा खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, औरंगाबाद व पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेत राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना रुपये 56 कोटी 4 लाख 83 हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोकण, पुणे, औरंगाबाद नागपूर साठी निधी

यामध्ये विभागीय आयुक्त कोकणासाठी 26 कोटी 73 लाख 79 हजार रुपये, विभागीय आयुक्त पुणेसाठी 12 कोटी 76 लाख 14 हजार रुपये, विभागीय आयुक्त औरंगाबादसाठी 11 कोटी 57 लाख 78 हजार रुपये, विभागीय आयुक्त नागपूरसाठी 4 कोटी 97 लाख 12 हजार रुपये, असे एकूण 56 कोटी 4 लाख 53 हजार इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी वितरित करण्यात आला असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

हे ही वाचा - Corona Update : राज्यात 1078 नवे कोरोनाबाधित, 48 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.